Fraud Case : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ३८ लाखांचा गंडा

कुटुंबीयांवर गुन्हा, तीन महिला अटकेत
sambhajinagar fraud case news
Fraud Case : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ३८ लाखांचा गंडाfile photo
Published on
Updated on

38 lakhs scammed by promising big returns

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महागडे मोवाईल आयात करून विक्री करण्याच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असून, माझ्याकडे गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे खोटे आमिष दाखवून शहरातील अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत बाळासाहेब मलठणकर (रा. शिवाजीनगर) असे मुख्य आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी व घरातील अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar fraud case news
Mini Ghati : मिनी घाटीतील ऑपरेशन थिएटर बंद

श्रीकांतची पत्नी मनीषा सुरेश बागुल हिच्यासह आई रेखा बाळासाहेब मलठणकर, बहीण स्वाती बाळासाहेब मलठणकर या तिघींना पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार धीरज रवींद्र सोनवणे (रा. सारा, राजनगर) यांची श्रीकांत मलठणकर याच्याशी मोबाईल दुरुस्तीच्या कामातून ओळख झाली होती.

श्रीकांतने आपण अॅपल आणि सॅमसंगचे फोन आयात करून भारतीय बाजारपेठेत विकतो आणि त्यातून मोठा नफा मिळवतो, असे भासवले. या व्यवसायात पैसे गुंतवल्यास ३० ते ४० दिवसांत मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्याने सोनवणे यांना दाखवले.

sambhajinagar fraud case news
विमानतळाची तुटलेली भिंत बनली कचराकुंडी

सोनवणे यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मिळून सुमारे १२ लाख २५ हजार रुपये गुंतवले होते. मात्र त्यांना केवळ ४ लाख ६० हजार रुपये परत मिळाले असून, त्यांचे ६ लाख ६५ हजार रुपये अद्याप श्रीकांतकडे थकीत आहेत. केवळ सोनवणेच नव्हे, तर त्यांच्यासारख्या इतर अनेक प्रतिष्ठित नागरिकांचीही अशीच फसवणूक झाली आहे. यामध्ये सुरेश संतोष पवार : (१६.५१ लाख), राजू सुरेशराव नगरकर (११.९२ लाख), राजेंद्र सुंदरलाल ज्योतिषी (३.४९ लाख) या तिघांचेही पैसे मलठणकर कुटुंबीयांनी लाटले आहेत.

कुटुंबीयांच्या खात्यावर व्यवहार

फसवणुकीच्या या रकमेचे व्यवहार श्रीकांतची पत्नी मनीषा (ऊर्फ स्वरा) सुरेश बागुल, स्वाती मलठणकर, रेखा मलठणकर यांच्या बँक खात्यांवरून आणि फोन-पे वरून करण्यात आले होते. या सर्वांनी संगनमत करून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची एकूण ३८ लाख ५९ हजार ६० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. अधिक तपास उपनिरीक्षक वर्षा काळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news