Bribery case : पाचशे रुपयांची लाच घेणारा स्टॅम्प विक्रेता एसीबीच्या जाळ्यात

५ हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगत अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी केली.
Bribery case
श्रीकांत मोहनराव बनसोडpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर / जालना : गंगापूर येथील शासनमान्य स्टॅम्प विक्रेता श्रीकांत मोहनराव बनसोड (७०) याला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (दि.१६) सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई जालना येथील एसीबी पथकाने केली.

तक्रारदाराला शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असल्याने त्यांनी यापूर्वी १३ मार्च रोजी बनसोड यांच्या दुकानातून ५०० रुपयांचा एक व १०० रुपयांचे दोन असे तीन स्टॅम्प पेपर खरेदी केले होते. त्यानंतर १६ मार्च रोजी ५०० रुपयांचे दहा स्टॅम्प पेपर घेण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, बनसोड यांनी ५ हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगत अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी केली.

Bribery case
Electricity bill recovery drive : महावितरणचा वीज बिल थकबाकीदारांना दणका

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत जालना येथील - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सोमवारी गंगापूर येथील एस. एम. बनसोड स्टॅम्प विक्रेता दुकानात पंचासमक्ष सापळा कारवाई केली. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडून ५५०० रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. यात ५ हजार रुपये हे स्टॅम्प पेपरची किंमत तर ५०० रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.

अंगझडतीदरम्यान एक मोबाईल, घड्याळ, अंगठी तसेच रोख रक्कम मिळून आली. आरोपीकडून या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या पथकाने केली. उपअधीक्षक बाळू जाधवर यांनी पर्यवेक्षण केले.

Bribery case
Bribe Case : १० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news