illegal sand mining : अवैध मुरूम अन् वाळू उपशावर गंगापूर पोलिसांची धडक कारवाई

पाचजण ताब्यात, १ कोटी २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
illegal sand mining
illegal sand mining : अवैध मुरूम अन् वाळू उपशावर गंगापूर पोलिसांची धडक कारवाईfile photo
Published on
Updated on

Gangapur police take strict action against illegal sand mining

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर पोलिसांनी शिवना नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर शुक्रवारी मध्यरात्री धडक कारवाई करत जेसीबी, तीन टिप्पर व ब्रास वाळूसह एकूण १ कोटी २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

illegal sand mining
Illegal Sand Mining : दोन दिवसांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त !

पहिल्या कारवाईत वैभव सोमीनाथ पडोळ (रा. झोडगाव), मनोज बाळासाहेब चव्हाण (रा. सिध्दनाथ वाडगाव) व नितीन दिलीप राजपूत (रा. खोपेश्वर) यांना शिवना नदीपात्रातून शासनाची वाळू विनापरवाना उपसा करून वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक जेसीबी, दोन टिप्पर व दोन ब्रास वाळूसह ६७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३३७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत भगवान बाळासाहेब टेमकर (रा. भालगाव) व फारूक सांडू पठाण (रा. भालगाव) यांना अवैध मुरूम वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक जेसीबी, एक हायवा, एक ब्रास मुरूम असा ३३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्र. ३३८/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

illegal sand mining
Illegal Sand Mining : चिखलठाणमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापा

दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत. सदरील कारवाई पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक पाटील, पोहेकॉ पाखरे, पोना जाधव, पोकॉ खाडे, पोकॉ नागरे, पोकॉ बापते व पोकॉ पंडित यांनी संयुक्तपणे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news