Illegal Sand Mining : दोन दिवसांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त !

नदीतून हायटेक क्रेन, जेसीबीसह ३७ तराफे जप्त; पोलिसांची वाळूमाफियांवर कारवाई
Illegal Sand Mining
दोन दिवसांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त !pudhari photo
Published on
Updated on

संग्राम मोरे

नवीन नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू (रेती) चोरणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी सलग दोन दिवस मोठी कारवाई केली आहे.

विष्णुपूरी आणि कल्लाळ भागातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल २ कोटी ५३ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी वाळू उपसा करणारी यंत्रे जागीच जाळून नष्ट केली आहेत.

पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Illegal Sand Mining
Illegal Sand Mining | गोदावरी पात्रातील वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; 3.21 कोटींचा मुद्देमाल जप्त, 16 जणांविरुद्ध गुन्हे

पहिली कारवाई : कल्लाळ भागात १ कोटीचा माल जप्त

पहिली कारवाई २० जून रोजी दुपारी कल्लाळ आणि पिंपळगाव निमजी भागातील गोदावरी नदीपात्रात झाली. रेतीमाफिया नदीतून जेसीबी आणि हायवा गाडीच्या मदतीने वाळूची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिथे छापा टाकून १ हायवा ट्रक, १ जेसीबी, २६ तराफे आणि ७ इंजिन असा एकूण १ कोटी १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. पोलिसांनी २६ तराफे आणि ७ इंजिन जागीच जाळून टाकले, तर वाळूने भरलेला ट्रक जप्त केला. या प्रकरणी ५ जणांसह एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई : विष्णुपुरी भागात दीड कोटीचा धक्का

ही कारवाई ताजी असतानाच, २२ जून रोजी पहाटे पोलिसांनी विष्णुपुरी जवळील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर दुसरी मोठी कारवाई केली. क्रेन आणि इंजिनच्या मदतीने चोरून वाळू काढली जात असताना पोलिसांनी तिथे धाड टाकली. या कारवाईत २ मोठ्या हायटेक क्रेन, १ जेसीबी, ११ तराळे आणि ५ इंजिन असा तब्बल १ कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी या कारवाईतही ११ तरापा आणि ५ इंजिने जागीच जाळून खात केली, तर वाळू नदीत ओतून नष्ट केारी. या ठिकाणी चार आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

Illegal Sand Mining
Illegal Sand Mining Nanded | वाळू माफियांवर मोठी कारवाई : विष्णुपुरी गोदावरी नदीपात्रात छापा; १.५१ कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलिसांचा कडक इशारा..

पकडण्यात आलेल्या सर्व १०आरोपींवर चोरी, पर्यावरण कायदाआणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळू उपशासाठी वापरले जाणारे कोट्यवधी रुपयांचे तराफे आणि इंजिन पोलिसांनी नदीपात्रातच जाळून टाकल्यामुळे रेतीमाफियांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. ही धडक कामगिरी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news