Illegal Sand Mining : चिखलठाणमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापा

68 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त; वाळू तस्करात धास्ती
Illegal Sand Mining
चिखलठाणमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापाpudhari photo
Published on
Updated on

कन्नड : तालुक्यातील चिखलठाण शिवारात गांधेरी नदीपात्रातून विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीवर ग््राामीण पोलिसांनी सोमवारी (दि.8) मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि दोन मोबाईल फोनसह तब्बल 68 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चिखलठाण शिवारातील चेतन चव्हाण यांच्या शेतालगत, ग््राामपंचायतीच्या सरकारी विहिरीच्या बाजूला असलेल्या गांधेरी नदीपात्रात काही जण अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकून जेसीबीच्या सहाय्याने आणि मोबाईलच्या उजेडात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरत असताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आले.

Illegal Sand Mining
Sand Smuggling : वाळू तस्करांना दणका! जळगाव जिल्ह्यात पाच ठिकाणी पोलिसांचे छापे; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची गाडी पाहताच दोन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॉलीमधील वाळू पुन्हा नदी पात्रात खाली करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. शासनाचा कोणताही महसूल (रॉयल्टी) न भरता, स्वतःच्या फायद्यासाठी ही वाळू चोरून नेली जात होती. तसेच चालकांकडे वाहनांचे कोणतेही वैध कागदपत्रे आणि परवाना नव्हता.

Illegal Sand Mining
illegal sand mining : गोदावरी पात्रात ऑपरेशन क्रूक डाऊन; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या प्रकरणी अरबाज गुलाब शेख (24) अनिल वसंतराव चव्हाण (34) मनोज वसंत चव्हाण (32,जेसीबी चालक) दीपक सांडू नागिले (42) विवेक नारायण दळे (21, सर्व रा.चिकलठाण, ता.कन्नड) यांच्या विरुध्द कन्नड ग््राामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कैलास करवंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news