Gangapur Police | दिवाळीत हुल्लडबाजी महागात पडली; रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या चौघांवर गंगापूर पोलिसांची कारवाई

Gangapur Police | गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे रहदारीच्या रस्त्यावर एकमेकांवर फटाके फोडणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Gangapur Police
Gangapur Police
Published on: 
Updated on: 

गंगापूर, (पुढारी वृत्तसेवा):

दिवाळीचा उत्साह साजरा करताना सार्वजनिक रस्त्यावरच फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना लक्ष्य करण्याचा धक्कादायक प्रकार जुने कायगाव येथील चौकात घडला. रात्रीच्या वेळी रहदारी सुरू असतानाच रस्त्यावर फटाके फोडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

Gangapur Police
Direct Pipeline Project | गंगापूर धरण थेट जलवाहिनीची डेडलाइन पुन्हा उलटली; 200 कोटींच्या प्रकल्पाचे काम अजूनही अपूर्णच

या प्रकाराची गंभीर दखल घेत गंगापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५, २७० आणि २९२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुने कायगाव रोडवरील चौकात कदिर अकबर शेख, प्रतीक बाळू चिते, प्रसाद नामदेव गायकवाड आणि रोहित बाळासाहेब भोगे (सर्व रा. जुने कायगाव, ता. गंगापूर) हे एकमेकांविरुद्ध रस्त्यावर फटाके फोडत होते. यावेळी सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला.

Gangapur Police
Water Problem | गंगापूर व आळंदीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; सिद्धपिंपरीतील पाणी परिषदेत आक्रमक भूमिका

या प्रकरणी पोलीस कर्मचारी विठ्ठल भाऊसाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४६ वाजता गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विठ्ठल जाधव पुढील तपास करीत आहेत.
सार्वजनिक रस्त्यावर रहदारी सुरू असताना फटाके फोडण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सण-उत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे भान राखण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.