Direct Pipeline Project | गंगापूर धरण थेट जलवाहिनीची डेडलाइन पुन्हा उलटली; 200 कोटींच्या प्रकल्पाचे काम अजूनही अपूर्णच

Direct Pipeline Project | वारंवार मुदतवाढीनंतरही 200 कोटींच्या प्रकल्पाचे काम अपूर्णच
water pipeline
water pipeline
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वारंवार मुदतवाढ देऊनही गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम अद्यापही अपूर्ण राहिले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या २०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला महापालिका प्रशासनाकडून ऑक्टोबरची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

water pipeline
President Droupadi Murmu | सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांमुळे नाशिक कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील जोडणीला आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी असून, त्यानंतर संपूर्ण जलवाहिनीच्या चाचणीसाठी दोन दिवसांचा शटडाऊन घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे नव्या जलवाहिनीद्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी नाशिककरांना आता नोव्हेंबरअखेरची वाट पाहावी लागणार आहे.

शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशनमार्फत पाणी बारा बंगला व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शहराची वाढती लोकसंख्या आणि जुन्या जलवाहिनीची झालेली दूरवस्था लक्षात घेता नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. १८०० मिमी व्यासाच्या या जलवाहिनीमुळे पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि सिडको या विभागांतला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे.

मात्र, कामातील दिर्गार्इमुळे प्रशासनाला नगरसेवकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. 'जिंदाल' कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्ववाहिनीचा विस्तार या प्रकल्पांतर्गत केला जात आहे. महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये मक्तेदाराला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

तरीही काम पूर्ण न झाल्याने १ मेपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. १ ते १५ मेदरम्यान दररोज एक लाख रुपये, तर १६ मेपासून दररोज अडीच लाख रुपये दंड आकारला जाता आहे. आतापर्यंत ठेकेदारावर सव्वाशे कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम अद्याप देयकातून वसूल करण्यात आलेली नाही.

water pipeline
Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

दिवाळीनंतर दोन दिवस शटडाऊन

पुढील आठवड्यात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात थेट जलवाहिनीची अंतिम जोडणी केली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणी प्रक्रियेसाठी दिवाळीनंतर १४ व १५ नोव्हेंबरला दोन दिवसांचा शटडाऊन घेण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे. आधीच १० टक्के पाणीपातळी अटळ बनली असताना सलग दोन दिवसांचा शटडाऊन नाशिककरांवर मोठे संकट निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.