Sambhajinagar Crime : अपघातानंतर चोरटी वाळू वाहतूक करणारा टाटा ४०७ जप्त

गंगापूर-भेंडाळा रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन जप्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
Gangapur Sand Smuggling
अपघातग्रस्त अवस्थेत आढळलेला वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो. (छाया : रमाकांत बन्सोड)
Published on: 
Updated on: 

गंगापूर : गंगापूर- भेंडाळा रस्त्यावर शासकीय महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो गंगापूर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.२२ वाजण्याच्या सुमारास गंगापूर-भेंडाळा रस्त्यावरील अंजली पेट्रोलपंपासमोर (एमएच ०४ सीए ८११५) क्रमांकाचा टाटा ४०७ टेम्पो अपघातग्रस्त अवस्थेत आढळला. अपघातामुळे वाहनाची समोरील दोन्ही चाके बाजूला झाली होती, तसेच समोरील भागाचेही नुकसान झाले होते.

Gangapur Sand Smuggling
Chhatrapati Sambhajinagar Fraud Case : वैजापूरच्या पेट्रोल पंपात ५० टक्के नफ्याचे आमिष दाखवून महिलेला ५० लाखांचा गंडा

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे सहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि सहा हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Gangapur Sand Smuggling
Pradeep Purnekar Case: पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड! टल्ली-पपलूंची रवानगी तळोजा कारागृहात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news