Chhatrapati Sambhajinagar Fraud Case : वैजापूरच्या पेट्रोल पंपात ५० टक्के नफ्याचे आमिष दाखवून महिलेला ५० लाखांचा गंडा

पंपाचा ठेका रद्द झाल्याचे लपवून हडपली रक्कम, अन्य दाम्पत्याचीही दीड कोटीची फसवणूक
Chhatrapati Sambhajinagar Fraud Case
Chhatrapati Sambhajinagar Fraud Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील पेट्रोल पंपाच्या व्यवसायात भागीदारी देऊन नफ्यातील ५० टक्के हिस्सा देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका ४३ वर्षीय महिला व्यापाऱ्याची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने संबंधित पेट्रोल पंपाचा ठेका रद्द करून दुसऱ्या कंपनीला दिल्याची महत्त्वाची बाब लपवून ठेवत ही फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२३) पुण्यातील मे. मगर फ्युएल स्टेशनचे कालिदास विजय मगर (३७, रा. मगर आळी, हडपसर, पुणे), आनंद मदनलाल लाहोटी (४३) आणि मदनलाल मोतीलाल लाहोटी (६७, दोघे रा. हांडेवाडी रोड, श्रीराम चौक, हडपसर, पुणे) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case
Sambhajinagar Fraud Case : तरुणाची १० लाखांची एफडी हडपली

याप्रकरणी फिर्यादी शहाना रुही शकील सय्यद (४३, रा. रचनाकार कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती पूर्वी पुण्यात नोकरीस असताना त्या सय्यदनगर, हडपसर येथील मे. मगर फ्युएल स्टेशनवर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या. तिथे त्यांची ओळख मदनलाल लाहोटी यांच्याशी झाली. मदनलाल यांनी आपला मुलगा आनंद आणि कालिदास मगर यांची ओळख करून दिली.

आरोपींनी सांगितले की, आमचा पुण्यात आणि वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे एमएसडब्ल्यूसी अंतर्गत एचपीसीएलचा पेट्रोल पंप आहे. या व्यवसायातून मोठा नफा मिळतो. तुम्हाला केवळ आर्थिक गुंतवणूक करायची असून संपूर्ण व्यवस्थापन आम्ही स्वतः करू आणि नफ्यात ५० टक्के हिस्सा देऊ. त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून शहाना यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून ५० लाख रुपयांची जुळवाजुळव केली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन्ही बाजूंमध्ये सामंजस्य करारनामा करण्यात आला. शहाना यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या दोन धनादेशांद्वारे एकूण ५० लाख रुपये मे. मगर फ्युएल स्टेशन'च्या बँक खात्यात वर्ग केले.

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case
Nanded News : गडग्यात पिसाळलेल्या तीन वानरांचा धुमाकूळ!

सततच्या टाळाटाळीमुळे संशय आल्याने शहाना यांनी १३ मे २०२६ रोजी आरोपींना करारनामा रद्द करून स्वतःची ५० लाखांची मूळ मुद्दल व थकीत नफा परत देण्याची मागणी केली; मात्र आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान, शहाना यांनी पडताळणी केली असता एमएसडब्ल्यूसीने जांबरगाव पंपासाठी दिलेली मे. मगर फ्युएल स्टेशनची नियुक्ती ८ ऑगस्ट २०२५ रोजीच रद्द केली होती आणि पंपाचे संचालन मे. पालेजा पेट्रोलियमकडे सोपवले होते.

ही बाब आरोपींना ठाऊक असूनही त्यांनी ती फिर्यादी महिला व्यापाऱ्यापासून लपवून ठेवली आणि ५० लाख रुपये उकळून गंडा घातला. तसेच, या व्यवसायात साक्षीदार मोहन मोरे आणि नीता मोरे यांनीही १ कोटी ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवली असून त्यांचीही आरोपींनी अशाच प्रकारे फसविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निसार अहमद करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case
Nanded Agriculture News : किनवट तालुक्यात ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सुरुवातीला नफा देऊन संपादन केला विश्वास

गुंतवणूक मिळवल्यानंतर संशयितांनी शहाना यांचा विश्वास संपादन करण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ या तीन महिन्यांचा ठरलेला नफा नियमितपणे दिला. मात्र, मे आणि जून २०२५ पासून त्यांनी नफा देणे अचानक बंद केले. वारंवार मागणी केल्यानंतर आजारपणाची कारणे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये दोन महिन्यांचा नफा दिला; मात्र त्यानंतर पुढील कोणताही नफा किंवा व्यवसायाचा हिशोब देणे पूर्णपणे बंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news