

ठाणे: स्व.प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग उर्फ पपलू यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यामुळे एसआयटी टीमने सुट्टीच्या शनिवारी कोर्टात ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती गायत्री गुंठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलाने आरोपीचा तपास करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायमूर्ती गुंठे यांनी मागणी फेटाळली. टल्ली आणि पपलू याना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
दोघांनाही नवीमुंबईच्या तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोपींची तीन चॉपरचा वापर केला होता. त्यातील दोन चॉपर पोलिसांनी हस्तगत केलेलं आहेत. तर तिसरा चॉपर एसआयटी पोलिसांनी शुक्रवारी दहिसर मोरी येथील झाडाझुडपांमधून जप्त केला.