Gangapur Crime News: मुलगी नांदवण्याचा वाद! ७० वर्षाच्या पित्याला विवस्त्र करून मारहाण, घरासह २५० क्विंटल कांदा जाळला

Gangapur Crime News
Gangapur Crime Newspudhari
Published on
Updated on

Gangapur crime news family dispute: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भालगाव शिवारात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मंडळींनी ७० वर्षीय वृद्धाला विवस्त्र करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी ज्वलनशील पदार्थ टाकून घर आणि शेतातील सुमारे २५० क्विंटल कांद्याला आग लावली. या आगीत घरातील रोख रक्कम, अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Gangapur Crime News
Mungsapur Ashram Controversy | मुंगसापूर आश्रमात पपई विक्रीवरून शेतकऱ्याला मारहाण; बापू महाराजांसह 8 जणांवर गुन्हा, जेहूर गाव बंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news