Mungsapur Ashram Controversy | मुंगसापूर आश्रमात पपई विक्रीवरून शेतकऱ्याला मारहाण; बापू महाराजांसह 8 जणांवर गुन्हा, जेहूर गाव बंद

Sambhajinagar News | बापू महाराजांच्या केबिनसमोर फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण
Mungsapur Ashram assault case
कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील आश्रमात मारहाण झाल्याने शेतकरी बबन पवार यांच्या पाठीवर असे वळ उमटले आहेतPudhari
Published on
Updated on

Mungsapur Ashram assault case

कन्नड: तालुक्यातील मुंगसापूर येथे आश्रम परिसरात पपई विक्रीवरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बापू महाराजांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन जयवंतराव पवार (रा. जेहूर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी म्हणून मुकुंद शंकर पाटील उर्फ मुक्तानंदगिरी महाराज (बापू महाराज), रा. ब्रह्मश्री जनार्दन स्वामी आश्रम, मुंगसापूर यांच्यासह संजय नवनाथ फोलाने, आकाश रावसाहेब गोडसे, आकाश नवनाथ फोलाने, रविंद्र रावसाहेब गोडसे (सर्व रा. तांदुळवाडी, ता. कन्नड) तसेच इतर तिघांचा समावेश आहे.

Mungsapur Ashram assault case
Sambhajinagar News : मनपाची ४५० कोटींची विक्रमी वसुली

ही घटना ३१ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आश्रम परिसरात घडली. फिर्यादी बबन पवार हे आश्रमाच्या आवारात पपई विक्री करत असताना आरोपींनी त्यांना तेथे विक्री करू नका असे सांगितले. त्यानंतर पवार यांनी आश्रमाबाहेरील रस्त्यालगत पपई विक्री सुरू केली. मात्र, आरोपींनी एकत्र येत त्यांची कॉलर पकडून त्यांना जबरदस्तीने आश्रमात नेल्याचा आरोप आहे.

तेथे बापू महाराजांच्या केबिनसमोर फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच आरोपी मुकुंद पाटील यांनी पायातील लाकडी पादुकांनी पाठीवर, डाव्या हातावर आणि छातीवर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय संजय फोलाने यांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Mungsapur Ashram assault case
Sambhajinagar Crime News : दरोड्यातील दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

तक्रारीनुसार, आरोपींनी “याला ठार मारा व आश्रमाच्या मागे पुरून टाका” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या घटनेनंतर १ एप्रिल रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जेहूर गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. संतप्त नागरिकांनी चौकात एकत्र येऊन निषेध नोंदवला आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news