

छत्रपती संभाजीनगर : पोळा सण होताच गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यासाठी शहरात गणेश मंडळाने विविध प्रकारचे देखावे गणेशोत्सवाचे नियोजन करून देखावेही उभारणे सुरू आहे. यंदा चिकलठाणा परिसरात श्री सावता गणेश मंडळाच्या वतीने दीड एकर जागेवर बद्रीनाथ देखावा सरकारला जाणार आहे. त्यामुळे शहरवासींना शहरातच बद्रीनाथाचे दर्शन घेता येणार आहे.
शहरात आता गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. ही परंपरा काही गणेश मंडळाच्या वतीने आता जोपासली जात आहे. ज्यात शहरवासीयांसाठी देखील एक आकर्षण बनत चालले आहे. शहरातील काही गणेश मंडळाच्या वतीने आकर्षक देखावे साकारले जातात. जे शहरातील नागरिकांना आकर्षण बनते. असेच श्री गणेश सावता गणेश मंडळाच्या वतीने चिकलठाणा येथे गणेश-ोत्सव काळात आकर्षक देखावे साकारत आहे. १९८३ या वर्षी श्री सावता गणेश मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारण्यात येत असून अनोख्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश-ोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी मात्र गणपती बाप्पा बरोबर बद्रीनाथ मंदिराचे देखील दर्शन शहरवासीयांना
घडविले जाणार आहे. जवळपास दीड एकर जागेवर हा देखावा साकारण्यात येणार आहे. हे यंदाचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. जे शहरवासियांना अनुभवता येणार आहे. मागील वर्षी मंडळाच्या वतीने वैष्णवी देवीचे मंदिराचे दर्शन देखाव्यातून घडविण्यात आले होते.
गेले एक महिन्यापासून देखावा साकारण्यासाठी श्री सावता गणेश मंडळाच्या वतीने मेहनत घेतली जात आहे. बद्रीनाथ मंदिर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे प्रतिकृती असणार आहे. दीड एकर जागेवर उभारण्यात येणारा हा देखावा आहे. त्यात ३५ फूट उंच असे हे बद्रीनाथ मंदिर असणार आहे. जवळपास १५ फूट उंच, असे भाविकांना चालावे लागणार आहे. गरम पाण्याची नदीही यावर साकारण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी खास व्यवस्था यामध्ये केली जाणार आहे. मंदिराच्या बाहेर चप्पल स्टॅण्ड असणार आहे. तसेच देखाव्यात झाडे लावून हिरवळही दिसणार आहे. असा हा भव्य देखावा शहरवासीयांना अनुभवता येणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष बाळू नवपुते, उपाध्यक्ष सागर नवपुते सह आदी गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यासाठी मेहनत घेत आहेत.