Sambhajinagar News : गांधी पुतळा - अप्पाहलवाई हेरिटेज वॉक

आखाड्याची माती, पेढ्यांचा इतिहास
Sambhajinagar News
Sambhajinagar News : गांधी पुतळा - अप्पाहलवाई हेरिटेज वॉकfile photo
Published on
Updated on

Gandhi Statue - Appahalwai Heritage Walk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गांधी पुतळा ते आप्पा हलवाई या मार्गावर आयोजित केलेल्या या हेरिटेज वॉकमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या हृदयात वसलेल्या शहागंज, सराफा, धावणी मोहल्ला आणि पानदरीबा परिसराचा रंजक इतिहास उलगडत गेला. निमित्त होते, ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शीख पंथाचे भाई दयासिंहजी यांचे ३६५ वे जयंती वर्ष या दुग्धशर्करा योगायोगाने या वॉकला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

Sambhajinagar News
Mahesh Landge : सहिष्णुता, नम्रता, शांतता आम्हीच बाळगायची का?

इतिहासाची पाऊलखुणा शोधत निघालेला हा जथ्था जेव्हा शहराच्या गजबजलेल्या भागातून फिरला, तेंव्हा जुन्या काळातील वैभव डोळ्यांसमोर जिवंत झाले. या सफरी दरम्यान भाविकांचे आणि इतिहासप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिर, उदासी आखाडा-जुन्या काळातील साधू-संतांच्या वास्तव्याची आणि परंपरेची साक्ष देणारी जागा.

भाई दयासिंहजी गुरुद्वारा शीख पंथाचा पवित्र इतिहास आणि सेवाभावाची शिकवण देणारे अध्यात्मिक केंद्र. शहरवासीयांसाठी ऐतिहासिक वॉक आयोजित करणारे इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी, अॅड. स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे यांनी प्रत्येक वास्तूचा, गल्लीचा आणि ऐतिहासिक घटनेचा धागा न धागा उलगडून दाखवला. त्यांच्या रंजक आणि माहितीपूर्ण मार्गदर्शनामुळे हा वॉक केवळ एक फेरफटका न राहता इतिहासाची एक जिवंत शाळा बनला.

Sambhajinagar News
नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळा

या वॉकचा सर्वात थरारक आणि मराठमोळा अनुभव ठरला तो म्हणजे उस्ताद बाबूलालजी बाखरिया यांच्या कुस्ती आखाड्याला दिलेली भेट. लाल मातीचा सुवास आणि अंगात संचारणारे स्फुरण घेऊन सर्व इतिहासप्रेमी या आखाड्यात पोहोचले. यावेळी ऐश्वर्या बाखरिया यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आखाड्याचा इतिहास लाल मातीची महती आणि बाखरिया उस्तादांची परंपरा याची विस्तृत्त माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news