Gambling : ऑनलाईन गेमिंगच्या आडून जुगार; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

एलसीबीने दहा दिवसांतच केला खेळ खल्लास, कुंभेफळच्या रो हाऊसमधून ९ जणांना बेड्या
Gambling News
Gambling : ऑनलाईन गेमिंगच्या आडून जुगार; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाशFile Photo
Published on
Updated on

Gambling under the guise of online gaming; International racket exposed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तरुणाईला ऑनलाईन गेमिंगच्या नादाने बेटिंग करण्यास भाग पाडून रक्कम उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. कुंभेफळ भागातील एका रो हाऊसमध्ये सेटअप उभारल्याची माहिती मिळताच बुधवारी रात्री छापा मारून ९ आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीचा मास्टरमाइंड छत्तीसगडमध्ये असून, या रॅकेटचे दुबई कनेक्शन समोर आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली. दहा दिवसांपूर्वीच सुरू झालेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. दुबई व अन्य देशातून रॅकेट ऑपरेट होत असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे यात आर-ोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Gambling News
Hurda party : थंडीची चाहूल : हुरडा पार्टीचा उत्साह, आयोजकांकडून जोरदार तयारी

सुरज किरणसिंग पचलोरे (२६, रा. एन-७, सिडको पोलिस कॉलनी), प्रणव प्रल्हाद मानकर (२६, रा. एन-६, आविष्कार कॉलनी), महेंद्र विनायक नवग्रह (२६, रा. एन-१२. स्वामी विवेकानंदनगर), प्रतीक नितीन मोरे (२६, रा. प्रतापगडनगर, एन-९), सौरभ राजेंद्र महाले (२७, रा. भवानीनगर) आणि छत्तीसगड येथील राहुल शिवनाथ इनसेना (२०), सुरत कुमार यादव (२७), रोहन विशमकुमार (२७), शाहदाब खान वकील खान (२८) अशी अटकेतील आर-ोपींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, करमाड हद्दीतील कुंभेफळ येथील अशोक विठ्ठल मुंढे (रा. न्यायनगर) यांच्या ड्रीम सिटी सोसायटीतील रो हाऊस क्र. १४ मध्ये काही जण ऑनलाईन गेमिंग जुगार खेळवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना प्राप्त झाली होती. त्यांनी तात्काळ पथकासह छापा मारला. बाजूच्या रो हाऊसवरून पोलिसांनी गच्चीवर जाऊन वरच्या दारातून आत प्रवेश केला. तिथे ९ जण इंटरनेटच्या माध्यमातून लॅपटॉप, मोबाईलचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन गेम खेळण्यास प्रोत्साहित करून गेमिंगमध्ये पैसे जिंकण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याचे दिसून आले.

Gambling News
Sambhajinagar News : महावितरणच्या जीवावर इच्छुकांचा असाही प्रचार

फत्यांच्याकडून ५ लॅपटॉप, १ टॅब, २२ मोवाईल, ६ सिमकार्ड, ४ क्यूआर कोड स्कॅनर, २१ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट, क्रेडिट कार्ड, १ दुचाकी, ३५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा ८ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय संतोष मिसळे, पवन इंगळे, पीएसआय महेश घुगे, दिलीप चौरे, जामदार विठ्ठल डोके, रवींद्र लोखंडे, सचिन सोनार, शिवानंद बनगे, दीपक सुरोशे, अंगद तिडके, समाधान दुबिले, महेश विरुटे, योगेश तरमाळे, गणेश घोरपडे, योगेश मोईन, राजेश राठोड, मुकेश वाघ आदींच्या पथकाने केली.

दिल्लीत शिकून सुरू केला धंदा

आरोपी सुरज पचलोरे हा एमपीएड, तर आरोपी मानकर हा सिव्हिल इंजिनीअर आहे. एक ते दीड वर्षापूर्वी पचलोरे दिल्ली येथे गेला होता. त्याची तिथे छत्तीसगडच्या मास्टरमाइंडशी ओळख झाली. त्याने गेमिंग जुगार शिकला. तेथून परत आल्यानंतर त्याने एक ते दीड लाख रुपयांची जुळवाजुळव केली. मुंढे यांचा रो हाऊस भाड्याने घेऊन त्यात सेटअप उभारला. स्थानिकच्या चार जणांना सोबत घेऊन त्यांच्या नावाने बँक खाते उघडून ट्रॅन्जेक्शन सुरू केले. दहा दिवसांत ५ ते ७ लाखांचे टोळीने व्यवहार केले. पचलोरेने अन्य आरोपींना दरमहा १५ हजार पगार ठरविला होता. मात्र, दहा दिवसांतच त्यांचा खेळ पोलिसांनी खल्लास केला.

साऊथ बुक वेबसाईटची व्हॉट्सअॅपवर लिंक

आरोपींची टोळी तरुणांना साऊथ बुक या वेबसाईडची व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवतात. सोबत क्यूआर कोडचा फोटोही पाठवण्यात यायचा. रजिस्ट्रेशन करण्यास 'सांगून आयडी पासवर्ड दिला जायचा. समोरच्याने लॉग इन केल्यानंतर बेटिंग करण्यासाठी वॉलेटमध्ये पैसे भरण्यास सांगितले जाते. १०० ते ५००० अशा रकमेत बेटिंगचे ऑप्शन दिले जातात. सुरुवातीला काही रक्कम जिंकू देऊन जाळ्यात ओढले जाते. पैसे विड्रॉल होतात, असा समज करून खेळणारा अधिक रक्कम टाकतो. त्यानंतर त्याला गेममध्ये हरवून पैसे हडप केले जायचे.

छत्तीसगडहून पाठवली माणसे

छत्तीसगडचा मास्टरमाइंड पचलोरेच्या संपर्कात आहे. पार्टनरशिपमध्ये दोघांनी हा धंदा सुरू केला होता. काही रक्कम छत्तीसगड तर काही पचलोरेकडे यायची. मात्र येथे लक्ष ठेवण्यासाठी छत्तीसगडहून चार जणांना इथे पाठविण्यात आले होते.

या गेम्सवर चालते बेटिंग

क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, एव्हिएटर, कॅसिनो, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बेसबॉल आईस हॉकी, कब्बडी या खेळांवर बेटिंग केली जाते. पैसे लावून लोकांना अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखविले जाते. ही वेबसाईड इंग्लिश, मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news