

company loses 3-7 crore whatsapp dp cyber fraud
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सर्व कंपनी खात्यांचे बॅलन्स तपासा... स्क्रीनशॉट पाठवा असा व्हॉट्सअॅप मेसेज आला. व्हाट्सअपच्या डीपीवर मालकाच्या मुलीचा फोटो पाहून कंपनीतील कॅशियरने मॅसेजमध्ये मिळालेल्या दोन खात्यावर तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये आरटीजीएसने पाठवले. दरम्यान मालकाने असा कोणताही मॅसेज केला नसल्याचे सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. ही घटना १४ ते १५ सप्टेंबरदरम्यान गारखेडा परिसरातील आदित्यनगरात घडली. याप्रकरणी दोन खातेधारकांसह एका मोबाइल धारकावर जवाहरनगर पोलिस ठाझ्यात रान्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर माने (४२, रा. लक्ष्मीनगर, बजाजनगर) आदित्यनगरातील एस. डी. दवंडे इन्फ्रा प्रा. लि. कंपनीत अकाउंटंट आहेत. विविध कामकाजासाठी कंपनीने चार व्हॉट्सअॅप ग्रुप बनले आहेत. त्यापैकी एक आर्थिक व्यवहारासाठीचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये कंपनीचे संचालक संदेश दवंडे व सहकारी अर्जुल बहीर आहेत. दवंडे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने स्वाक्षरी केलेले धनादेश, स्लिप व आरटीजीएस फॉर्म ठेवून गेले होते.
१४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता माने यांच्या मोबाइलवर कंपनीच्या सर्व बँक खात्यांचे बॅलन्स तपासून त्याचे स्क्रीनशॉट पाठविण्यास सांगण्यात आले माने यांनी सकाली १०.२३ वाजता स्क्रीनशॉट पाठविले. माने यांच्या व्हाट्स्ट्सअपवर आलेल्या मॅसेजच्या डीपीवर दंवडे यांच्या मुलीचा फोटो असल्याने माने यांनी हा मॅसेज खरा समजून खातरजमा न करताच लखनौच्या अलिगंज शाखेतील एसकेवाय पे प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यावर बँक ऑफ इंडिया शाखेच्या खात्यातून १ कोटी ७० लाख रुपयांचे आरटीजीएस केले. तसेच दुसऱ्या मॅसेजच्या सांगण्यानुसार पाटणा येथील इंडसइंड बँकेच्या कंकेरबाग शाखेतील आरएमआरएस जन कल्याण हॉस्पिटल प्रा. लि.च्या खात्यावर २ कोटी रुपये असे कंपनीच्या खात्यातन 3 कोटी ७० लाख रुपये वर्ग झाले.
मालकाच्या फोनमुळे उलगडा
एवढा व्यवहार झाल्यानंतरही पुन्हा २ कोटी रुपये पाठविण्यासाठीचा मॅसेज आला. संशय आल्याने माने यांनी यांनी बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरटीजीएस थांबविण्याची विनंती केली. बँकेने इंडसइंड बँकेला ई-मेलद्वारे माहिती दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माने यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करीत आहेत.