Fraud Case :शेती खरेदीचे आमिष; १८ लाखांची फसवणूक

हा व्यवहार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
Sambhajinagar fraud case
Fraud Case :शेती खरेदीचे आमिष; १८ लाखांची फसवणूक(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Fraud involving the promise of purchasing farmland; ₹18 lakh swindled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शेती खरेदीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे व खोटे जमीनमालक उभे करून एका कुटुंबाकडून तब्बल १८ लाख ९० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घडला. अर्जुन सखाराम तांबे, सुरेखा तांबे (दोघे रा. मुकुंदनगर) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar fraud case
Sambhajinagar Fraud Case : निवृत्त पीएसआयलाच लावला १ कोटी ३३ लाखांचा चुना

मनीषा श्रीकांत मोरे (४८, रा. जयभवानी नगर) यांची अर्जुन तांबे व त्याची पत्नी सुरेखा तांबे यांच्याशी ओळख होती. या दरम्यान त्या दोघांनी मौजे सांजखेडा येथील गंगुबाई थोरात यांची २ एकर शेती विक्रीस असल्याचे सांगितले. या जमिनीचा व्यवहार ४२ लाखांत ठरवण्यात आला.

२२ फेब्रुवारी रोजी इसारापोटी १.९० लाख रुपये व २३ फेब्रुवारी रोजी पुंडलिकनगर येथील ज्वेलर्स दुकानात मनीषा मोरे यांनी सोन्याचे दागिने मोडून १७ लाख रुपये अर्जुन तांबे याला दिले. हा व्यवहार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

Sambhajinagar fraud case
५ लाखांच्या कर्जासाठी ३२ लाखांची वसुली

इसारपावतीच्या वेळेस एका महिलेला गंगुबाई थोरात व एका व्यक्तीला सुरेश थोरात म्हणून उभा करण्यात आले. कागदपत्रांमध्ये १० लाख रुपये रोख दिल्याचा उल्लेख करून उर्वरित रक्कम नोंदणीवेळी देण्याचे ठरले. पूर्ण व्यवहार झाल्यानंतरही आणखी ५ लाख रुपयांची मागणी केल्याने मोरे कुटुंबाला संशय आला. त्यांनी १० मार्च रोजी सांजखेडा येथे जाऊन चौकशी केली असता खऱ्या जमीनमालक गंगुबाई थोरात यांनी कोणतीही जमीन विक्रीस काढलेली नसल्याचे समोर आले. तसेच इसारपावतीवरील फोटो व आधारकार्ड बनावट असल्याचेही निष्पन्न झाले.

फसवणूक लक्षात आल्यानंतर अर्जुन तांबे याच्याशी संपर्क साधला असता त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी अर्जुन तांबे, सुरेखा तांबे व इतर दोघांविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news