Fraus Case : ३५ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा

ऊसतोडणी कामगार पुरविण्याचे आश्वासन देऊन ३५ लाख ४० हजार रुपये उचल कामगार न पुरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Fraud Case: ₹35 lakh fraud; case registered against four individuals

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडणी कामगार पुरविण्याचे आश्वासन देऊन ३५ लाख ४० हजार रुपये उचल घेतल्यानंतरही कामगार न पुरविल्याप्रकरणी वाळूज पोलिसांनी चौघांविरुद्ध बुधवारी (दि. १९) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Crime News
Solar Power Project : वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी मनपाचा सौरऊर्जा प्रकल्प

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगतपुरी (ता. पैठण) येथील अर्जुन नामदेव खेडकर हे मुक्तेश्वर शुगर मिलमध्ये ऊसतोडणी कंत्राटदार आहेत. मागील हंगामात न्यायडोंगरी (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील काही कामगार त्यांच्याकडे ऊसतोडणीसाठी आले होते. या कामगारांनी चांगला व्यवहार केल्याने खेडकर यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.

यंदाच्या हंगामासाठीही न्यायडोंगरी भागातील कामगारांना ऊसतोडणीचे काम देण्याचे ठरले. त्यासाठी खेडकर यांनी ३५ लाख ४० हजार रुपये उचल देण्याचे मान्य केले. संबंधितांनी बँक खात्यावर पैसे जमा न करण्यास सांगितल्याने खेडकर यांनी अशोक राजाराम दळवी यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन-पेद्वारे १६ लाख ७१ हजार २०० रुपये, तर १८ लाख ६८ हजार १०० रुपये रोख दिले.

Crime News
Wastage of Water एकीकडे जल बचाव रॅली, दुसरीकडे पाण्याचा अपव्यय

मात्र, हंगाम सुरू झाल्यानंतरही संबंधितांनी ठरल्याप्रमाणे कामगार पुरविले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खेडकर यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी ताराचंद देविदास मोरे, प्रकाश युवराज वाघ, लक्ष्मण ताराचंद मोरे (तिघे रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) आणि विष्णू धुलसिंग मोरे (रा. हिंगणघाट, ता. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यवहार १ जानेवारी २०२५ ते १९ ऑगस्ट २०२६ दरम्यान झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी गोरे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news