Wastage of Water एकीकडे जल बचाव रॅली, दुसरीकडे पाण्याचा अपव्यय

मालमत्ताधारकाला १० हजारांचा दंड : पैठण गेटवरील प्रकार, टाक्या भरल्यानंतरही सुरूच होते पाणी
Wastage of Water
Wastage of Water एकीकडे जल बचाव रॅली, दुसरीकडे पाण्याचा अपव्ययfile photo
Published on
Updated on

On one hand, a 'Save Water' rally; on the other, the wastage of water

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी एकिकडे महापालिकेची जल बचाव रॅली सुरू असतानाच दुसरीकडे पैठण गेट परिसरात शुक्रवारी (दि. २१) सकाळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचा प्रकार समोर आला. इमारतीच्या टाक्या भरल्यानंतरही नळ सुरूच ठेवल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आले. रॅलीत सहभागी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी याची तातडीने दखल घेत कारवाईचे आदेश दिले. नागरी मित्र पथकाने संबंधित इमारत मालकाचा शोध घेऊन १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. संबंधित नागरिकाने दंडाची रक्कम ऑनलाइन भरली.

Wastage of Water
Saksham App : महापालिकेकडून दिव्यांगांसाठी सक्षम ॲप

देण्यासाठी क्रांतीचौकातून शुक्रवारी सकाळी जल महापालिकेकडून पाणी बचतीचा संदेश बचाव रॅली पैठण गेट, गुलमंडीमार्गे काढण्यात आली. हि रॅली पैठण गेट परिसरात पोहोचली. त्यावेळी देशमुख फोटो स्टुडिओच्या इमारतीतून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत होते. या पाण्यामुळे रस्त्याचा बराच भाग ओला झालेला होता.

एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन आणि दुसरीकडे रस्त्यावर वाहणारे पाणी, असा विरोधाभास रॅलीतील नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी तत्काळ नागरी मित्र पथकाला संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील स्वर्णसिंग परदेशी, देविदास सुसर, जनार्दन सांगळे, आबाराव सोळंके आदींनी पाहणी केली.

Wastage of Water
Sambhajinagar News : विनापरवाना मांसविक्री करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा

ही इमारत नीलेश देशमुख यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान शहरात अनेक भागांत पाणीपुरवठा काही दिवसांच्या अंतराने होत असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. टाक्या भरल्यानंतर नळ बंद करणे, गळती तातडीने दुरुस्त करणे, वाहन अथवा रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी न वापरणे, यासह सार्वजनिक नळ सुरू राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्तांचा इशारा : पाण्यासारख्या अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संसाधनाचा अशा पद्धतीने अपव्यय करणे योग्य नसून, नागरिकांनी पाणी वापरताना अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. शहरात नागरिकाकडून कोणत्याही स्वरूपात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- अमोल येडगे, मनपा, आयुक्त

दोन टाक्या भरल्या, तरी नळ सुरूच

इमारतीच्या टेरेसवर पाहणी केली असता दोन हजार आणि एक हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या असल्याचे आढळले. दोन्ही टाक्या भरल्यानंतरही पाण्याचा पुरवठा सुरूच होता. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर वाहत होते. या इमारतीत २० पेक्षा अधिक मुले भाडेकरू म्हणून राहत असल्याची माहिती पथकाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news