Sillod News : भाजपच्या किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवणारे चार जण ताब्यात

हल्ला करण्याचा प्रयत्न भाजपचा आरोप, उपविभागीय कार्यालयाबाहेरील घटना
भाजपच्या किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवणारे चार जण ताब्यात
भाजपच्या किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवणारे चार जण ताब्यात File Photo
Published on
Updated on

Four people arrested for showing black flags to BJP's Kirit Somaiya

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. १) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवणारे चार जण ताब्यात
केळगाव ओव्हरफ्लो, खेळणात आवक वाढली

शेख इम्रान शेख नजीर, अशपाक निसार खा पठाण, पठाण फईम खा मुनीर खा, रफिक उस्मान शेख या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ताब्यातील चार व दोन अन-ोळखी अशा सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट जन्म - मृत्यू प्रकरणी सोमवारी किरीट सोमय्यांनी पाचव्यांदा सिल्लोडला भेट दिली. उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्याशी चर्चा करीत असताना कार्यालयाबाहेरील गेटवर काही तरुणांचा जमाव जमला. पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. या दरम्यान सोमय्या जळगावला जाण्यासाठी निघाले. किरीट सोमय्यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर निघताच काही तरुणांनी काळे झेंडे दाखवत गाडी थांबण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवणारे चार जण ताब्यात
Sambhajinagar Crime: हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्या 'कला केंद्रा'त राडा, डीजेवर गाणी लावण्यावरून वाद

मात्र आधीच लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले. तर दोघे पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हल्ल्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप

दरम्यान काळे झेंडे दाखवल्याच्या घटनेनंतर काही वेळात किरीट सोमय्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, असे ट्विट केले. तर गादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करीत कारवाई करण्याची मागणी भाजपचे सुरेश बनकर, कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू, विष्णू काटकर, शामराव आळणे, राजेंद्र शिरसाठ आदींनी शहर पोलिसांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news