

Kelgaon overflows, arrivals in Khelana increase
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्प रविवारी (दि. ३१) रात्री ओव्-हरफ्लो झाला, तर आवक वाढल्याने खेळणा मध्यम प्रकल्पाची पातळी २५ टक्क्यांवर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, यात निल्लोड व केळगावचा समावेश आहे. खेळणात आवक वाढल्याने प्रशासनासह शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून भाग बदलत दमदार पाऊस पडत आहे. केळगाव, आधारवाडी परिसरात दमदार पाऊस झाल्याने केळगाव लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. हा प्रकल्प भरल्याशिवाय खेळणात आवक वाढत नाही. केळगाव प्रकल्प भरल्याने खेळणा प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
खेळणा प्रकल्पावर शहरासह बारा-पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यापूर्वी निल्लोड प्रकल्प ओव्- हरफ्लो झालेला आहे. निल्लोड प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने निल्लोड, कायगाव, केन्हाळा, गे-वराई सेमी, बनकिन्होळा आदी गावांचा पाणी प्रश्न निकाली लागला आहे. तर खेळणा, चारनेर-पेंडगाव, अजिंठा अंधारी हे प्रकल्प भरण्यासाठी अजुनही दमदार पावसाची गरज आहे.
नेवपूर-पूर्णा, अंजना नदीवरील पिशोर येथील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यातील अंजना, पूर्णा नद्या मनसोक्त वाहत आहे. यामुळे नदी काठावरील गावांचा पाणी प्रश्न तर मार्गी लागलाच, शिवाय रबी हंगामाच्या आशाही पल्लवित झाल्या आहे.
मका, सोयाबीन पिके अंतिम टप्प्यात असताना तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तर रबी हंगामासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.
तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सिल्लोड मंडळात ३४४ मिमी पाऊस झाला. भराडी ४५१, अंभई ५७८, अजिंठा ४९३, गोळेगाव ६४५, आमठाणा ५११, निल्लोड ५४२ तर बोरगाव बाजार मंडळात ४७८ मिमी पावसाची नोंद झाली.