Sillod News : अजिंठ्यात व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून पाच लाख लांबवले

हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या भुसार व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवली.
sillod news
अजिंठ्यात व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून पाच लाख लांबवलेfile photo
Published on
Updated on

Five lakh rupees stolen from a merchant's car in Ajanta after smashing the window

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या भुसार व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचखेड्याजवळील हॉटेल अजिंठा येथे घडली.

sillod news
Ganeshotsav 2026 : कैलास पर्वत, तिरुपती मुकुट अन् १५ फुटी 'बॅलेंसिंग' बाप्पाने वेधले लक्ष!

चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्यांनी बँकेपासून व्यापाऱ्याचा पाठलाग केल्याचा संशय आहे. भारत विठ्ठल तायडे (वय ३४, रा. अंधारी, ता. सिल्लोड) हे भुसार मालाचे व्यापारी आहेत. त्यांनी शनिवारी दुपारी सिल्लोड शहरातील एसबीआय बँकेतून पाच लाख रुपये काढले.

दोन मित्रांसोबत कारने (एमएच-०२, सीआर-२५७४) अंधारीकडे जात असताना ते चिंचखेड्याजवळील हॉटेल अजिंठा येथे जेवणासाठी थांबले. यावेळी पैशांची बॅग कारच्या मागील सीटवरच राहिली. तायडे व त्यांचे मित्र हात धुण्यासाठी गेले आणि टेबलवर बसल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी कारची काच फोडून बॅग लांबवली होती.

कारजवळ गेल्यानंतर काच फुटलेली आणि बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर व बीट जमादार धनराज खाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करीत आहेत.

sillod news
Justice Nitin Suryawanshi : तुरुंगाच्या भिंती स्वातंत्र्य मर्यादित करू शकतात, मानवी प्रतिष्ठा नाही

तिघे सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकींवरून तिघे चोरटे आल्याचे दिसून आले. एका दुचाकीवरील दोघांपैकी एक जण खाली उतरून कारजवळ थांबला. व्यापारी व त्यांचे मित्र हात धुण्यासाठी जाताच त्याने कारची काच फोडून बॅग काढली. त्यानंतर तिघेही दुचाकींवरून पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news