Ganeshotsav 2026 : कैलास पर्वत, तिरुपती मुकुट अन् १५ फुटी 'बॅलेंसिंग' बाप्पाने वेधले लक्ष!

शहरात गणेशोत्सवाचा उत्साह : छत्रपती शंभुराजे, सिद्धिविनायक आणि राजयोद्धा मंडळांचे आकर्षक देखावे; विविध उपक्रमांची रेलचेल
Ganeshotsav 2026
Ganeshotsav 2026 : कैलास पर्वत, तिरुपती मुकुट अन् १५ फुटी 'बॅलेंसिंग' बाप्पाने वेधले लक्ष!file photo
Published on
Updated on

Ganeshotsav 2026 : Mount Kailash, Tirupati Mukut and 15 feet 'Balancing' Bappa get attention

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गणेशोत्सवात विविध मंडळांनी साकारलेले कल्पक आणि आकर्षक देखाचे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू तरत आहेत. रेणुकानगर येथील छत्रपती शंभुराजे मंडळाचा 'कैलास पर्वत', शिवाजीनगरच्या श्री सिद्धिविनायक मंडळाचा 'तरिपती बालाजीचा मुकुट', तर शिवशंकर कॉलनीतील राजयोद्धा मंडळाची १५ फुटी 'बॅलेंसिंग' मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. या भव्य देखाव्यांसोबतच या मंडळांच्या यतीने विविध सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचीही रेलचेल पाहायला मिळत आहे.

श्री सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ (शिवाजीनगर, गारखेडा)

गारखेडा परिसरातील या मानाच्या मंडळाचे यंदा ३२ वे वर्ष असून, त्यांनी दक्षिण भारतातील प्रसिद्ध 'श्री तिरुपती बालाजीच्या श्री मुकुटाचा' देखावा साकारला आहे. रात्रीची आकर्षक विद्युत रोषणाई येथे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, सुगम संगीत, भजनासोबतच लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी 'होम मिनिस्टर' सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरती, महाप्रसाद आणि भव्य विसर्जन मिरवणुकीने सांगता होईल. निकेत सोनवणे, विशाल रोडसमुद्रे, अभिषेक अंकुश, मंगेश कारभार, चैतन्य औटे, रोहित खोतकर, कुणाल राजपूत आदी पदाधिकारी यासाठी झटत आहेत.

छत्रपती शंभुराजे गणेश मंडळ (रेणुकानगर)

२००४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने यंदा भगवान शंकर विराजमान असलेला 'कैलास पर्वताचा' मनमोहक देखावा साकारला आहे. उत्सवादङ्ख्यान मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, धावणे अशा विविध स्पर्धासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात येणार आहे. मंडळाचे सदस्य निखिल पडूळ, सचिन ईधाटे, शुभम दौड, ऋषिकेश औटे, शुभम माने, ओम शिरसाठ, श्रेयस लधाने, राज बडजावत, आदेश माडि आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

राजयोद्धा गणेश मंडळ (शिवशंकर कॉलनी)

या मंडळाचे यंदा १५ वे वर्ष असून, त्यांनी मुंबईच्या धर्तीवर १५ फूट उंच 'बॅलेंसिंग' मूर्तीची स्थापना केली आहे. देवगाव रंगारी येथील मूर्तिकार अनिकेत मोरे यांनी शहरातील सर्वांत उंच मूर्तींपैकी एक असलेली ही मूर्ती साकारली आहे. यापूर्वी मंडळाने बाहुबली, श्रीराम, छावा अशा रूपातील मूर्ती बसवल्या होत्या. आरोग्य शिबिर आणि स्पधचि आयोजन करणाऱ्या या मंडळाला विविध पारितोषिक मिळाले आहे. संस्थापक अध्यक्ष अजय दहिफळे, संजय संत्रे, सुनील सोनवणे, सोहम कुमटकर, आकाश जाधव आदी कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news