गंगापुरात पाच उमेदवारांची माघार

गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत चालले आहे.
voting
votingPudhari News Network
Published on
Updated on

Five candidates withdraw from the election in Gangapur

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत चालले आहे. जिल्हा परिषदेच्या एका उमेदवाराने व पंचायत समितीच्या चार गणांमध्ये चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एकूण उमेदवारांची संख्या घटली आहे.

voting
Paithan News : वाळूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; ५ जणांवर गुन्हे दाखल

गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ९ गटांतून एकूण ८१ उमेदवार रिंगणात होते तर आज एका उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आज रोजी ८० उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये सुरुवातीला १४४ उमेदवार रिंगणात होते. मात्र आज चार उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता १४० उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

आज झालेल्या अर्ज माघारी प्रक्रियेत दि. २३ रोजी लिंबे-जळगाव गणातून ज्योती तुकाराम मिठे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच घोडेगाव गणातून उषा अर्जुन पवार (अपक्ष) यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.

voting
Social Media Campaigning : तरुण उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर

दिनांक २४ रोजी जिल्हा परिषद जोगेश्वरी गटातून सोनु अमोल लोहकरे तर शिल्लेगाव गणातून भाऊसाहेब आसाराम चिंधे व सावंगी गणातून सुरेश अंबादास जाधव यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले असून २७ जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असल्याने आणखण उमेदवारअर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

प्रचाराला येणार वेग

अर्ज माघारीनंतर आता तालुक्यातील अनेक गणांमध्ये थेट लढतींचे चित्र स्पष्ट होत असून प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिकच गती येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news