

Action taken against sand smugglers; cases registered against 5 people
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात गुरुवारी दि.२२ रोजी अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पैठण पोलिसांनी कारवाई करून ६० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाघाडी येथील गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळूची तस्करी करण्यात येत असल्याने. गुरुवारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या पोलिस पथकाने छापा मारून गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना चार टिप्पर व एक वाळू भरण्यासाठी वापरणारे लोडर ट्रॅक्टर जप्त करून एकूण ६० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून शाहरुख चाँद शेख रा. नवीन कावसान पैठण, अदनान इक्बाल शेख रा. साळीवाडा पैठण, अविष्कार संजय जाधव रा. मुधलवाडी, ता. पैठण, स्वप्निल गणेश चव्हाण रा. नवीन कावसान पैठण, अक्षय गोल्टे पैठण हे टिप्परच्या सहाय्याने वाळूची चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील टिप्परमध्ये वाळू भरण्यासाठी गोदावरी नदीत आढळून आले.
या कारवाईमध्ये वाळू भरण्यासाठी वापरण्यात येणारे लोडर ट्रॅक्टरचा चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणादले आहे.
वाळू चोरीमुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडत असल्याने नदीपात्रा धोक्यात आले आहे. महसूल प्रशासनासह पोलिसांनी यापेक्षा मोठी कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यातून होत आहे. पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर हे करीत.