Firecrackers : दिवाळीच्या आतषबाजीसाठी तब्बल १० कोटींचे फटाके

शहरात अयोध्यानगरीसह पाच ठिकाणी मार्केट सजले
Firecrackers
Firecrackers : दिवाळीच्या आतषबाजीसाठी तब्बल १० कोटींचे फटाकेfile photo
Published on: 
Updated on: 

Firecrackers worth a staggering 10 crore for Diwali celebrations

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दीपोत्सव म्हणजेच दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीत जोरदार आतषबाजीची परंपराही कायम असल्याने फटाका बाजार सज्ज झाला आहे. यंदा दिवाळीनिमित्त शहरात अयोध्यानगरीसह पाच ठिकाणी मार्केट सजले असून, सुमारे १० कोटी रुपयांचे फटाके विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करणारे विविध प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध झाले असून, ग्राहकांच्या स्वागतासाठी विक्रेत्यांनी जय्यत तयारी केली आहे.

Firecrackers
Chief Minister's Relief Fund : मुलाच्या विवाहाचा शाही थाट टाळत शेतकऱ्यांसाठी दिला १ कोटीचा निधी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाका विक्री केंद्रांवर विविध कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या किमर्तीचे फटाके दाखल झाले आहेत. यंदा २० ते २५ टक्क्यांनी फटाके महाग झाले असले तरी हौशींकडून फटाक्यांची खरेदी होणारच आहे. फुलबाज्या, अनार, चक्री, भुईचक्र, रॉकेट, लवंगी फटाके, लक्ष्मी बॉम्ब यांसह रंगीबेरंगी आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण कायम आहे.

कमी आवाजाचे आणि आकर्षक रोषणाई करणारे फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या फटाक्यांचे कॉम्बो पॅक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरात एकूण १२ फटका मार्केट आहेत. यंदा या मार्केटमध्ये २१८ फटाक्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये अंदाजे १० कोटींहून अधिकचा माल विक्रीसाठी दाखल झाला आहे. स्टॅण्डर्ड कंपन्यांच्या मालाच्या दरांमध्ये यंदा ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.

Firecrackers
Sambhajinagar news : जिल्ह्यात ४.६९ लाख शेतकऱ्यांना ५ हजार वितरित
उद्यापासून वेग वसू बारसपासून दीपावली सणाला सुरुवात होते. यंदा ५ नोव्हेंबर रोजी वसूबारस आहे. या अनुषंगाने फटाक्यांच्या किरकोळ खरेदीला सुरुवात झाली असली ५ तारखेपासून खरेदीचा वेग वाढणार आहे.
- गोपाळ कुलकर्णी,
मोठ्या उलाढालीची अपेक्षा 66 शिवकाशी येऊन फटाक्यांची आवक सुरूच आहे. ५ तारखेपर्यंत अंदाजे ८ ते १० कोटींचे फटाके शहरात विक्रीसाठी दाखल होतील. फटाका बाजारातही ग्राहकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीत मोठी वाढ होईल.
- मनोज गायके, अध्यक्ष, भारत माता फटाका असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.