Sambhajinagar news : जिल्ह्यात ४.६९ लाख शेतकऱ्यांना ५ हजार वितरित

दिवाळी अग्रिमचे २३४ कोटी वाटप, आता १.१५ लाख शेतकरी शिल्लक
Sambhajinagar news
Sambhajinagar news : जिल्ह्यात ४.६९ लाख शेतकऱ्यांना ५ हजार वितरितfile photo
Published on: 
Updated on: 

5,000 distributed to 4.69 lakh farmers in the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे जिल्ह्यात वितरण सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून ५ लाख ८५ हजार ९३ शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख ६९ हजार ५७९ शेतकऱ्यांच्या खात्यात २३४ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांची प्रत्यक्ष मदत वितरित केली आहे. मंजूर लाभार्थ्यांपैकी अद्याप १ लाख १५ हजार ५१४ शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळणे बाकी आहे.

Sambhajinagar news
Crime News : मिटमिटा येथील कोट्यवधींच्या जमिनीवर बुलडोझर चालवून डल्ला

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये अग्रिम मदतीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असून, तालुकानिहाय मंजूर लाभार्थी आणि प्रत्यक्ष वितरित मदतीच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत मदत जमा होण्याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार २७५० ७५० शेतकऱ्यांना अग्रिम मदतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

त्यापैकी ७४ हजार ७७८ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. वैजापूर तालुक्यात ९६ हजार ५७ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून, ८६ हजार ४४६ शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झाली आहे. मंजूर लाभार्थ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष वितरणाचे प्रमाण वैजापूरमध्ये अधिक आहे. पैठण तालुक्यात ८० हजार ८६७ शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून, ६३ हजार ७२१ जणांना मदत मिळाली आहे. कन्नड तालुक्यात ७८ हजार ७४८ मंजूर लाभार्थ्यांपैकी ६९ हजार २४८ शेतकऱ्यांना रक्कम वितरित झाली आहे.

गंगापूरमध्ये ६८ हजार ७८३ शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून, ६२ हजार ४६९ जणांच्या खात्यांत मदत जमा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून, ३६ हजार ७८१ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. फुलंब्री तालुक्यात ४६ हजार १६ मंजूर लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ३७९, खुलताबादमध्ये २३ हजार ५०६ पैकी २१ हजार ७९८, तर सोयगाव तालुक्यात २५ हजार ११४ मंजूर लाभार्थ्यांपैकी २० हजार ९५९ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

Sambhajinagar news
Health Centre : स्मार्ट आरोग्य केंद्रांच्या निविदेवरून जि. प. स्थायी समितीत खडाजंगी !

मदत वितरणाची प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये अग्रिम मदतीचे वितरण सुरू असून, मंजूर लाभार्थ्यांपैकी अद्याप १ लाख १५ हजार ५१४ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीतून आर्थिक दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.