Female foeticide racket busted: संभाजीनगरात 80 हजारांत गर्भलिंगनिदान- गर्भपात; दीड वर्षापासून सुरू होता पापाचा बाजार

chhatrapati sambhajinagar Female foeticide racket: तीन आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी
sambhajinagar crime news
स्त्रीभ्रूण हत्येचा 80 हजारांत सौदाfile photo
Published on
Updated on

chhatrapati sambhajinagar Female foeticide racket

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

मुलगी नको म्हणून गर्भातच तिची निघृण हत्या करणाऱ्या एका स्त्रीभ्रूण हत्या रॅकेटचा रविवारी (दि.५) सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. नकोशीला जन्मण्याआधीच संपवण्यासाठी या टोळीने अक्षरशः मृत्यूचा बाजार मांडला होता. ८० हजारांत गर्भलिंगनिदान आणि गर्भपात ही टोळी करून द्यायची, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता वाळूज पोलिसांनी काही वर्षांपूर्वी अटक केलेल्या कुख्यात डॉ. राजपूतचे नाव समोर आले असून, तो अवघ्या १५ हजार रुपयांत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे घरी जाऊन गर्भातील अर्भक मुलगी असल्याची खात्री करून देत होता.

sambhajinagar crime news
Partur Crime| परतूर हादरले; नवजात अर्भक प्रकरणात धक्कादायक खुलासा

अटकेतील डॉ. विकास मिठाराम आहेर (३२, रा. निल्लोड, ता. सिल्लोड), नर्स वर्षा बाबासाहेब जाधव (३०) आणि तिची बहीण उज्ज्वला विठ्ठल गायकवाड (३५, दोषी रा. सातारा गाव) या तिन्ही आरोपींना सोमवारी (दि.६) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील डॉ. राजपूत हा या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आहे. तो पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गरोदर महिलांच्या घरी जाऊन १५ हजारांत बेकायदेशीर तपासणी करायचा. लिंग निदान झाल्यानंतर निल्लोडचा डॉ. विकास आहेर या महिलांना गर्भपातासाठी शहरातील ज्योती पवारकडे पाठवायचा. धक्कादायक बाब म्हणजे डॉ. राजपूतवर यापूर्वीही राज्यभरात स्त्री उर्वरित रक्कम एजंट आणि डॉक्टरांमध्ये वाटली जात होती, असे पोलिस दलातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

sambhajinagar crime news
Crime News : आरोपी विशाल राठोडने उज्जैनवरून आणले पिस्तूल

भूणहत्येचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तरीही त्याचे हे काळे कारनामे छुप्या पद्धतीने सुरूच होते, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारी वकील सविता हिवराळे यांनी न्यायालयात आरोपींच्या गुन्ह्याची भीषणता मांडून पोलिस कोठडीची मागणी केली. उपनिरीक्षक निर्मला राख, गोविंद एकीलवाले, अंमलदार संदीप चिंचोले यांच्या पथकाने आरोपीना न्यायालयात हजर केले.

मुख्य आरोपीच्या घरात औषधांचा साठा

मुख्य सूत्रधार ज्योती पवार हिच्या देवळाईतील साई विश्व सोसायटी येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना तिथे गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या, सर्जिकल उपकरणे, सलाईन आणि इतर साहित्याचा मोठा साठा सापडला. हे साहित्य पाहून पोलिसही चक्रावून गेले.

गर्भपातासाठी सतत जागा बदलत

हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. पोलिसांचा संशय टाळण्यासाठी ज्योती पवार आणि तिच्या सोबतच्या परिचारिका (नर्स) एकाच ठिकाणी गर्भपात न करता सतत जागा बदलत असत. अनेकदा तर गरोदर महिलेच्या नातेवाइकांनाच गर्भपातासाठी सुरक्षित जागा शोधण्याची अट घातली जायची. यामुळे स्थानिक नागरिकांना किंवा पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा लागत नव्हता.

किती गर्भपात केले ?

आरोपींनी किती महिलांचे गर्भपात केले, असा प्रश्न न्यायाधीशांनी पोलिसांना विचारला. त्यावर तपास अधिकारी उपनिरीक्षक निर्मला राख यांनी तपास सुरू असून, दीड वर्षापासून हे रॅकेट सुरू होते, अशी माहिती न्यायालयात दिली. दरम्यान, आरोपींनी भूणांची विल्हेवाट कुठे लावली? प्रतिबंधित औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पुरवणारा कोण? याचा शोध घेणार असल्याचे सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news