Municipal Health Department Recruitment : महिला उमेदवारांना मुलाखतीपासून रोखले

मनपाच्या एमपीडब्ल्यू भरतीतील प्रकार : महिलांचा संताप
Municipal Health Department Recruitment
Municipal Health Department Recruitment : महिला उमेदवारांना मुलाखतीपासून रोखलेfile photo
Published on: 
Updated on: 

Female candidates barred from the interview

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातील एमपीडब्ल्यू पदांसाठी महिला उमेदवारांकडून अर्ज स्वीकारून प्रत्येकी २०० रुपये शुल्क घेण्यात आले. मात्र, अर्ज स्वीकारल्यानंतर ही पदे केवळ पुरुषांसाठी असल्याचे सांगत महिलांना मुलाखतीपासून दूर ठेवण्यात आले. तर घरी जाऊन कामे करा असे टोमणे मारण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला उमेदवारांनी बुधवारी (दि.३०) महापौर समीर राजूरकर यांची भेट घेतली. अखेर महापौरांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

Municipal Health Department Recruitment
Sambhajinagar News : वादग्रस्त बॉण्डवरील दस्त नियमित करण्यासाठी निदर्शने

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ८४ कंत्राटी पदांच्या भरती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये एमपीडब्ल्यूची २८ पदे आहेत. भरतीसाठी मंगळवारी (दि.२९) महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडून अर्ज स्वीकारण्यात आले तसेच २०० रुपये शुल्कही घेण्यात आले. मात्र, त्यानंतर बुधवारी एमपीडब्ल्यूची पदे केवळ पुरुष उमेदवारांसाठी असल्याचे सांगण्यात आले.

भरतीच्या जाहिरातीत पदांसाठी पुरुष उमेदवारांची अट नमूद असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र अर्ज आणि शुल्क स्वीकारल्यानंतर मुलाखतीपासून रोखण्यात आल्याने महिला उमेदवारांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर त्यांनी थेट महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. दरम्यान, भरती प्रक्रियेवेळी घरी जाऊन कामे करा, अशा स्वरूपाचे टोमणे मारण्यात आल्याची तक्रारही काही महिला उमेदवारांनी महापौरांकडे केली.

Municipal Health Department Recruitment
Crop Panchnama : पीक पंचनाम्यांचे दैनंदिन अहवाल पाठवा

या प्रकरणाची महापौरांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महिला उमेदवारांचे अर्ज स्वीकारून त्यांच्याकडून शुल्क घेण्यात आल्यानंतर त्यांना मुलाखतीपासून रोखणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उमेदवारांकडे आवश्यक गुणवत्ता असेल, तर त्यांना संधीपासून वंचिता ठेवता येणार नाही, अशी भूमिका महापौरांनी मांडली.

त्यानंतर महिला उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बोलावण्यात आले. बुधवारीच त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे सुरुवातीला भरती प्रक्रियेतून बाजूला पडलेल्या महिला उमेदवारांना अखेर मुलाखतीची संधी दिल्याने महिला उमेदवारांनी समधान व्यक्त करत शुल्क भरुनही महिलांना मुलाखतीपासून रोखणार्यावर प्रशासनाने वचक ठेवण्याची गरज असल्याचे महिलांचा सुर दिसून आला.

महिला उमेदवारांना अखेर संधी

अर्ज स्वीकारून शुल्क घेतल्यानंतर मुलाखतीपासून रोखलेल्या महिला उमेदवारांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेतली. महापौरांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित उमेदवारांच्या बुधवारी मुलाखती घेण्यात आल्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news