Crop Panchnama : पीक पंचनाम्यांचे दैनंदिन अहवाल पाठवा

शासनाचे जिल्हा प्रशासनाला आदेश, पहिल्या दिवशी ४९० गावांमध्ये प्रारंभ
Crop Panchnama
Crop Panchnama : पीक पंचनाम्यांचे दैनंदिन अहवाल पाठवाfile photo
Published on: 
Updated on: 

Send daily reports of crop panchnamas

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासन आदेशानुसार जिल्ह्यात पीक पंचनामे सुरू झाली आहेत. पहिल्याच दिवशी १३६५ पैकी सुमारे ४९० हून अधिक गावांमध्ये पंचनामे सुरू झाले आहेत. आता या पंचनाम्यांची दैनंदिन माहिती राज्याला सादर करावी लागणार असून तसे आदेशच शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Crop Panchnama
Sambhajinagar News : वादग्रस्त बॉण्डवरील दस्त नियमित करण्यासाठी निदर्शने

मान्सूचनच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांकडे यंदा वक्रदृष्टी केली होती. त्यामुळे मागील चार महिन्यांत पावसाचे प्रमाण अगदी कमी राहिले आहे. जिल्ह्यात तब्बल ३५ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश ट्रिगर - १ मध्ये झाला आहे.

यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. त्यासोबतच दुष्काळी सुविधांसह पीक पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि. २८) जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर तालुकास्तरावर पंचनाम्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासोबतच गाव पातळीवर पंचनामे करण्यासाठी ग्राम समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने मंगळवारपासून सर्वच ठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली. परंतु, पहिल्याच दिवशी ४९० हून अधिक गावांमध्ये प्रत्यक्षात पंचनामे सुरू करण्यात आले होते.

Crop Panchnama
Sambhajinagar News : दुष्काळामुळे शेतकरी जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ

शासनाने जारी केलेल्या प्र-पत्रकानुसार व सर्व अटीशर्तीची अंमलबजावणी करून पंचनामे सुरू झाले आहेत. दरम्यान, यंदा पंचनाम्यांसाठी जे प्रपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडौं आर्थिक मदत मिळण्यास मदत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले.

महसूल मंत्री करणार पाहणी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज (दि. १) रात्री छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहे. शुक्रवारी (दि. २) ते करमाड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदनसह इतर तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news