Crime News : मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन सपवले

तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Teen girl ends life
Crime News : मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन सपवलेPudhari File Photo
Published on
Updated on

Fed up with the harassment from her alcoholic husband, a married woman ended her life

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि.१६) सकाळी गळफास घेतला. तिला तात्काळ एमजीएममध्ये भरती करण्यात आले. मात्र शनिवारी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. ज्योती अमोल साळवे (२९) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

Teen girl ends life
भारत जागतिक उत्पादन पॉवरहाऊसच्या टप्प्यावर : बागला

तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती अमोल माणिकराव साळवे (रा. न्यायनगर) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, २२ जा नेवारीपर्यंत न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

ज्योतीचे वडील सोमीनाथ भीमराव सिरसाठ (५२, रा. सिरसगाव मंडप, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्या फिर्यादीनुसार, ज्योती व अमोलचे लग्न सन २०१६ मध्ये झाले होते. गेल्या सहा वर्षांपासून अमोल दारूच्या नशेत घरगुती कारणांवरून ज्योतीला मारहाण करायचा. तिच्यावर संशय घेऊन तिचा वारंवार अपमान करून शिवीगाळ करीत होता.

Teen girl ends life
मित्रासाठी पणाला लागलेली प्रतिष्ठा सावेंनी अखेर राखली

तसेच तू फाशी घेऊन मर, असे म्हणत तिला वारंवार हिनवत होता. या छळामुळे ज्योती अनेक वेळा माहेरी येऊन राहत होती. यापूर्वी पाच ते सहा वेळा मारहाण झाल्यानंतरही नातेवाइकांनी आणि गावातील नागरिकांनी समजूत काढून तिला सासरी पाठवले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये मध्यस्थीच्या बैठकीत अमोल साळवे याने सर्वांसमोर आपली चूक मान्य करून यापुढे त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ज्योती पुन्हा न्यायनगर येथील सासरी नांदण्यास गेली होती. मात्र त्यानंतरही तिच्या त्रास कायम सुरूच होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news