Mahavikas Aghadi Satara : बिजवडी सोसायटीत महाविकास आघाडीला धक्का

Satara Political News: भाजपची ‘सात विरुद्ध सहा’ अशी सरशी : ऐनवेळेी संचालकांनी मारली पलटी
MVA
MVAPudhari
Published on
Updated on

दहिवडी : बिजवडी विकास सोसायटीच्या ठराव प्रक्रियेत महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला असून, संख्याबळ असून ठराव गमवावा लागल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. पंचवार्षिक निवडणुकीत १३ पैकी १२ संचालक निवडून आणाऱ्या महाविकास आघाडीचा ठराव प्रक्रियेत पराभव झाला, तर भाजपचे विकास निंबाळकर यांच्या ठरावाला सात मते मिळवत विजय मिळाला.

MVA
MVA Internal Conflict: विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

बिजवडी विकास सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १२ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. भाजपडे केवळ एकच संचालक होता. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ठराव प्रक्रियेत राजकीय चित्र पूर्णपणे बदलले. भाजपचे विकास निंबाळकर यांच्या ठरावाला सात संचालकांनी पाठिंबा दिला, तर महाविकास आघाडीचे जनार्दन ऊर्फ बाबुराव भोसले यांना सहा मते मिळाली. महाविकास आघाडीतील सहा संचालकांनी ऐनवेळेी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने सात विरुद्ध सहा अशा मतांनी भाजपिने बाजी मारली. या निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MVA
MVA Internal Dispute: राष्ट्रवादीच्या माघारीवर काँग्रेसचा संताप;‌ ‘हा विश्वासघात, आता स्वबळाचा विचार‌’

या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील नियोजन आणि संघटनशक्तीमुळे हा विजय मिळाल्याचा दावा केला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष शंकर जाधव, संजय भोसले, बाबूराव दडस, विकास निंबाळकर, कमल विरकर, पांडुरंग साळुंखे, अशोक अडागळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे आणि पंचायत समिती सदस्य उदय भोसले यांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन केले. बिजवडी विकास सोसायटीतील या निकालामुळे आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या राजकारणात नवे संकेत मिळण्याची चर्चा असून, स्थानिक राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MVA
Washim MVA Protest | दरवाढ मागे घ्या, खताचा, पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत करा : महाविकास आघाडीची मागणी

मातब्बर नेत्यांच्या गावातच उलटफेर

बिजवडी हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव मानले जाते. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष संजय भोसले तसेच बाजार समितीचे संचालक ॲड. के. डी. भोसले यांसारखे प्रमुख नेते महाविकास आघाडीकडे असतानाही ठराव प्रक्रियेत सहा संचालक फुटल्याने स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news