

Farmers demand urea fertilizer in Gangapur and Vaijapur talukas, but shopkeepers are not supplying it.
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर : साहेब मातीतली पिकं पुन्हा मातीतच घालायची का? असा थेट सवाल सध्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील शेतकरी करत आहेत. कारण जिल्हा प्रशासनाच्या आकडेव-ारीनुसार युरियाचा पुरवठा असूनही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही. याउलट युरिया पाहिजे असेल तर, पोटॅश, झिंग नॅनो युरिया घ्या, असा गळा काढला जातोय. ऐन पिकं वाढीच्या टप्प्यात युरियासाठी ही अडवणुकीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम जोरात सुरू आहे. निसगनि यंदा साथ दिली असली तरी शेतकऱ्यांना खरी परीक्षा द्यावी लागतेय ती युरिया खतासाठी. वैजापूर व गंगापूर तालुक्यांत युरिया खताच्या गोण्या ५० हजारांहून अधिक उपलब्ध आहेत. खतांची उपलब्धता स्पष्ट करणाऱ्या कृषी विभागाच्या ब्लॉगची ही आकडेवारी आहे.
मात्र प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर युरिया मिळत नाही. शेतकऱ्यांकडून मतानुसार कृषी सेवा केंद्रांकडून युरिया हवं असेल तर त्यासोबत नॅनो युरिया, झिंग किंव्हा पोटॅश खतही घ्यावं लागेल, असा दबाव टाकला जातो. यामुळे युरियाची खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः अडवणूक आणि आर्थिक फसवणूक होते आहे. सध्या पिकं वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर आहेत. या टप्प्यावर युरिया न मिळाल्यास उत्पादनात मोठी घट येणार आहे. आधीच हमीभाव नाही, कर्जाचा बोजा आहे, अशात आता खताची ही कुचंबणा म्हणजे प्रशासन आमच्या मरणाची वाट बघतोय का? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटत आहेत.
युरियाचा कृत्रिम तुटवडा करण्यात येत आहे. कारण प्रशासन आणि कृषी सेवा केंद्र चालकांचे लागेबांधे आहेत. बाकी सर्व खते मुबलक उपलब्ध असताना आवश्यक असलेला युरियाच का? मिळत नाही. आणि मिळालाच तर त्यासोबत वाढीव भावात दुसरे बोगस खते घ्यावेचं लागतात, अन्यथा तोही मिळत नाही. आज पिकांना युरियाची नित्यांत गरज असल्याचे, प्रशासनात जाणून असून शांत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
तालुका : वैजापूर खताचा प्रकार : युरिया उपलब्ध गोण्या : २७,११७कृषी सेवा केंद्रांची संख्या : १२३ तालुका : गंगापूर खताचा प्रकार : युरिया उपलब्ध गोण्या : २२,५४६ कृषी सेवा केंद्रांची संख्या : ११२