

Environment Day Special: Special efforts to preserve mango trees
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचा राज्यवृक्ष, फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आज कलमी वाणांच्या वाढत्या प्रसारामुळे स्थानिक रायवळ (गावरान) जातींच्या अस्तित्वाच्या संकटाला सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिल्लोड येथील पर्यावरण दायित्व असलेले डॉ. संतोष पाटील यांनी रायवळ आंब्यांच्या संवर्धनासाठी हाती घेतलेले कार्य विशेष लक्षवेधी ठरत आहे. शेंद्रा, तांब्या, तुप्या, तेलंगी कागदी, पुंगटी, खाऱ्या, पादऱ्या, ढवळा, लोण्या आणि हडका अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण जाती आजही ग्रामीण भागात टिकून आहेत.
आंबा हा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होण ारा आणि भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते सांगणारा वृक्ष आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील चित्रशैलीतही आंब्याचे चित्रण आढळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रायवळ आंब्याच्या विविध स्थानिक जाती आढळतात.
खोबऱ्या, गोटी, चिकाड्या, साखऱ्या, शेप्या, चोख्या, नकट्या, चिपड्या, या स्थानिक वाणांचे जतन करण्यासाठी डॉ. पाटील विविध आंब्यांच्या कोयींचे संकलन करून त्यापासून रोपांची निर्मिती करत आहेत. तयार झालेली रोपे आगामी जुलै महिन्यात विविध ठिकाणी लावण्यात येणार असून गतवर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. विदर्भातील अकोला परिसरातील प्रसिद्ध साखऱ्या आंब्याचेही संकलन करून रोपनिर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.
आम्म्रसंस्कृतीचा समृद्ध वारसा आंबा हा नक्षत्रवृक्ष मानला जातो. तामिळ भाषेत मंगा हा शब्द तर इंग्रजीत मँगो शब्द रूढ झाला. सांची येथील स्तूपावरही आंब्याचे चित्रण आढळते. त्यामुळे आंबा हा केवळ फळझाड नसून भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. आंबा हा केवळ फळांचा राजा नसून जैवविविधतेचा आधार आहे. विदर्भातील अकोला परिसरातील प्रसिद्ध साखऱ्या आंब्याचेही संकलन करून रोपनिर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.
जैवविविधतेचा आधारस्तंभ
अन्नाचा स्रोत ठरतो. मधमाशा, इंडियन जेझेबल, ग्रे पंसी यांसारखी फुलपाखरे तसेच मुंग्या यांना त्यातून अन्न मिळते. कॉपर फ्लॅश, बॅरोनेट, कॉमन बेरोन या प्रजाती आंब्यावर अंडी घालून जीवनचक्र सुरू करतात. आंब्यावर उगवणाऱ्या डॅनड्रॉप्थ या बांडगुळाच्या पानांवर ब्रॉडटेल, पिकॉक रॉयल, कॉमन जेझेबल आणि व्हाईट रॉयल यांसारखी फुलपाखरे अंडी घालण्यास पसंती देतात. तसेच अनेक पक्षी, वटवाघुळे, खारी आणि माकडेही आंब्याची फळे खात असल्याने हा वृक्ष जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्थानिक जैवसंपदा जपण्याचा प्रभावी संदेश देत आहे.