Short Circuit : शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सुलतानपूर (माळवाडी) येथील घटना; शेतकऱ्याचे नुकसान
Short Circuit
Short Circuit : शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसानfile photo
Published on: 
Updated on: 

Sugarcane reduced to ashes due to short circuit; farmers suffer losses worth lakhs

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : शेंदुरवाडा परिसरातील सुलतानपूर (माळवाडी) येथे विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तोडणीला आलेला उभा ऊस जळून खाक झाला. सोमवारी (दि. ५) दुपारी अडीचच्या सुमारास गट क्रमांक १७७ मध्ये ही घटना घडली. या आगीत पाच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Short Circuit
Crime News : ओला चालकाकडून वृद्ध प्रवाशाला गंडा; फोन-पेवरून ९० हजार लंपास

सोमवारी दुपारी कडक उन्हात उसाच्या शेताला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण ऊस पिकाला विळखा घातला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची झळ आजूबाजूच्या शेतातील पिकांना पोहोचू नये, यासाठी शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीत अनिल निकम यांच्या १ हेक्टर २१ आर क्षेत्रातील उसाचे अंदाजे ५ लाख ७६ हजार रुपये, अशोक निकम यांच्या ३० आर क्षेत्रातील उसाचे १ लाख ४४ हजार रुपये, रमेश निकम यांच्या १ हेक्टर २१ आर क्षेत्रातील ५ लाख ७६ हजार रुपये, प्रसाद निकम यांच्या १ हेक्टर २१ आर क्षेत्रातील ५ लाख ७६ हजार रुपये, तर रामराव निकम यांच्या ३० आर क्षेत्रातील अंदाजे १ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Short Circuit
Sambhajinagar News : रुग्णांना वेळेत सुलभ आरोग्यसेवा द्या

दरम्यान, महसूल विभागाचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. दिवाळी सण तोंडावर आला असताना पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत जेमतेम पाण्यावर वाढविलेला आणि तोडणीला आलेला ऊस आगीत जळून खाक झाल्याने बाधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासकीय मदतीची मागणी

दुष्काळाच्या झळा सोसत असताना हाताशी आलेले पीक आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार तत्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news