Theft in the house : बंद घरातून १७ तोळे सोने, २ किलो चांदी लंपास

पैठण रोडवरील साई सृष्टी पार्कमधील घटना; सातारा पोलिसांत गुन्हा दाखल
Theft in the house
Theft in the house : बंद घरातून १७ तोळे सोने, २ किलो चांदी लंपासfile photo
Published on: 
Updated on: 

17 tolas of gold and 2 kg of silver stolen from a locked house

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठण रोड परिसरातील एका बंद फ्लॅटचे टॉमीने लॉक तोडून तोडून चोरट्यांनी तब्बल १७ तोळे सोने आणि २ किलो चांदीचे ५० वर्षांपूर्वीचे जुने दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी रविवारी पहाटे ४.१० ते ५:१५ वाजेच्या दरम्यान साई सृष्टी पार्क, गट नं. ४४ येथे घडली. तीन चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft in the house
Sambhajinagar News : रुग्णांना वेळेत सुलभ आरोग्यसेवा द्या

फिर्यादी ४५ वर्षीय महिला यांचे साई सृष्टी पार्क, गट नं. ४४, पैठण रोड येथे घर असून त्या पतीसह राहतात. तसेच समर्थ नगर येथे दुसरे घर असल्याने ते बहुतांश वेळा तिथेच राहतात. २१ ऑगस्ट २०२६ रोजी ते साई सृष्टी पार्कमधील घराला कुलूप लावून समर्थ नगर येथे गेले होते. रविवारी (दि. ४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.

फिर्यादीने तिथे धाव घेतली असता, घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५० वर्षांपूर्वीचे पारंपरिक सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही तपासले असता रविवारी पहाटे तीन अनोळखी चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरल्याचे दिसले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, गोविंद एकीलवाले, नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज आधारे गुन्हे शाखेची पथकानेही घरफोड्याचा कसून शोध घेत आहेत.

Theft in the house
Retired Employees Pension : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची फेरनिश्चिती; हायकोर्टाचा आदेश

हे दागिने गेले चोरीला

२ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १.५ तोळ्याची मोत्याची माळ, १.५ तोळ्याचे सोन्याचे झुमके, १ तोळ्याच्या दोन अंगठ्या, ३ तोळ्याचा नानु सेट, १ तोळ्याचे लॉकेट, १ तोळ्याचा सोन्याच व मोत्याचा सेट, ३ तोळ्यांच्या दोन बांगड्या, २ तोळ्याचे कानातील सोन्याचे चार जोड, १ तोळ्याच्य सोन्याच्या व मोत्याच्या चार बांगड्या, तोळ्याचा चांदीचा कमरपट्टा आणि किलो चांदीचे ग्लास आणि ट्रे अस लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक घोरपडे करत आहेत.

आधी दोन घरे फोडली

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिन्ही चोरट्यांनी या घरावर येण्यापूर्वी परिसरातील दोन घरे फोडली होती. मात्र, या दोन्ही घरांतून त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर त्यांनी फिर्यादी महिलेच्या बंद घराला लक्ष्य केले. तिन्ही चोरट्यांनी तोंडाला मास्क, पायात चप्पल न घालताच अनवाणी आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news