

Engine failure of Kacheguda-Nagarsol Express
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : काचिगुडा-नगरसोल एक्सप्रेस धावत असतानाच बदनापूरजवळ गुरुवारी (दि.३) सायंकाळी ६ ते सव्वासहा वाजेदरम्यान अचानक रेल्वेचे इंजिन बंद पडले. लोकोपायलटच्या ३५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर इंजिन सुरू करण्यात यश मिळाले. इंजिन सुरू झाल्यानंतर ही एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली. दरम्यानच्या काळात काही काळ जालन्याकडे जाणारी जनशताब्दी आणि वंदेभारत एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.
काचिगुडाहून निघालेली नगरसोल एक्सप्रेस सायंकाळी ६.३५ ते ६.४० वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्-वेस्थानकावर येते. दरम्यान ते छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना बदनापूरजवळ सायंकाळी ६ ते सव्वासहा वाजेदरम्यान अचानक इंजिन बंद पडले.
लोकोपायलटने तब्बल ३५ मिनिटे प्रयत्न करून इंजिन सुरू करण्यात यश मिळवले. सायंकाळी सातच्या सुमारास ही एक्सप्रेस संभाजीनगरकडे रवाना झाली. काही वेळाताच इंजिन सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान मुंबईहून जालन्याकडे येणाऱ्या जनशताब्दी व वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी ६.४५ आणि ७ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर येतात. बदनापूर येथे काचिगुडा नगसोल एक्सप्रेस बंद पडल्याने तब्बल ३५ मिनिटे थांबली होती. या वेळेत या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले.