Railway News : इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-इगतपुरी विभागात अटगाव येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी काम करण्यात येणार आहे.
sambhajinagar railway news
Railway News : इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणामPudhari File Photo
Published on
Updated on

Electronic Interlocking Impacts Some Trains

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-इगतपुरी विभागात अटगाव येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे काही रेल वेच्या मार्गात बदल तसेच काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

sambhajinagar railway news
Mumbai Local Train Megablock: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

या गाड्या मार्ग बदलून धावणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्हारशाह एक्सप्रेस ६ जून २०२६ रोजी कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड मार्गे धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली एक्सप्रेस ६ जून रोजी कल्याण-कर्जत-पुणे-दौंड-कुडुवाडी मार्गे धावेल.

sambhajinagar railway news
Raigad coastal disaster alert: रायगडमधील 99 गावे समुद्री आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील

या गाड्या अंशतः रद्द

हिंगोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ६ जून रोजी नाशिक रोड येथे अंशतः रद्द करण्यात येईल. नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ५ जून रोजी मनमाड येथे अंशतः रद्द करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली एक्सप्रेस ६ जून रोजी नाशिक रोड येथून अंशतः सुरू करण्यात येईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस ६ जून रोजी मनमाड येथून अंशतः सुरू करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news