

Eight-month pregnant married woman ends life
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील माऊलीनगर परिसरात आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या के ल्याची रजातपयताग। म धक्कादायक घटना रविवारी (दि.७) रात्री उघडकीस आली. पूजा अमित सवई (३०) असे विवाहितेचे नाव आहे.
पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कनिष्ठ अभियंता अमित सवई हे पत्नी व कुटुंबीयांसह माऊलीनगर येथे वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री ते किराणा आणण्यासाठी बाहेर गेले होते.
दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी पत्नीला आवाज दिला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बेडरूमचा दरवाजा उघडला असता पूजा या ओढणीच्या साहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदपाठक व डॉ. विशाल सूर्यवंशी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी पूजा या आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सोमवारी तिच्या पार्थिवाचे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी दीड वाजता पार्थिव त्यांच्या मूळ गावी लातूरला अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे तिने गळफास घेतला त्यावेळी तिची आई ही घरीच होती व पती बाहेर गेले होते. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ अमित पाटील, अजित नागलोत हे करत आहे.
पूजा यांच्या पश्चात पती आणि चार वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, तिने आत्महत्या का केली याची परिसरात चर्चा होत असून आत्महत्याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.