Sambhajinagar News : पोलिसांना टीप दिल्यावरून दारू विक्रेत्याची मजुराला मारहाण

दारू विक्रेत्यासह टोळक्याने मजुराला जिवे मारण्याच्या उद्देशाने दांड्याने जबर मारहाण करत पाय फॅक्चर केला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पोलिसांना टीप दिल्यावरून दारू विक्रेत्याची मजुराला मारहाणFile Photo
Published on
Updated on

Liquor vendor beats up laborer for giving tip to police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती का देतो, असे म्हणत दारू विक्रेत्यासह टोळक्याने मजुराला जिवे मारण्याच्या उद्देशाने दांड्याने जबर मारहाण करत पाय फॅक्चर केला. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी साडेचारच्या सुमारास बौद्धविहाराजवळील टपरीवर, मसनतपूर, एमआयडीसी चिकलठाणा भागात घडली. गणेश मिलिंद निकाळजे (३२, शहानगर, मसनतपूर) आणि त्याचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.

Sambhajinagar News
Token Sowing Machine : शेतकऱ्यांसाठी टोकन पेरणी यंत्र ठरले वरदान

गणेशला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मसनतपूर मुसा अब्दुल रजाक येथील घटना (५४, रा. मसनतपूर) हे फिर्यादी सय्यद रविवार असल्याने दिवसभर घरी होते. दुपारी ते घराजवळील टपरीवर गप्पा मारत बसले होते. तिथे आरोपी गणेश निकाळजे साथीदारांसह आला. त्याने क्युरे बुढे मेरे बारे मे पोलिस को माहिती क्यो देता? मे दारू बेचता तो तेरे बाप का क्या जाता, असे म्हणत दांड्याने ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीवर छातीवर, उजव्या पायावर जबर मारहाण केली. सय्यद यांनी मी पोलिसांना काहीही माहिती दिली नाही, असे सांगूनही त्याने ऐकले नाही.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : कामगारांच्या ४ झोपड्या जळून खाक

मारहाणीत त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला. आज तुला जिवे मारून टाकतो, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश निकाळजे हा सराईत आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news