Sambhajinagar News : खड्यांनी पोखरले शहरातील रस्ते

गणेशोत्सव तोंडावर : महापालिकेची विसर्जन मार्गावर पॅचवर्कची निविदा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : खड्यांनी पोखरले शहरातील रस्तेfile photo
Published on
Updated on

Potholes have riddled the city's roads

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः शहरातील मुख्य रस्त्यांपासून अॅप्रोच रोड आणि गल्लीबोळांपर्यंत सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक प्रभागाला वार्षिक ५० लाख रुपयांची तरतूद, खड्डे बुजविण्यासाठी सर्वसाधारण सभेने केलेली एक कोटींची स्वतंत्र तरतूद आणि सणासुदीच्या काळातील विशेष मोहीम असे पर्याय उपलब्ध असतानाही रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने विसर्जन मिरवणूक आणि बाजारपेठांमधील गर्दी लक्षात घेता प्रशासनासमोर रस्ते दुरुस्तीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Sambhajinagar News
Unauthorized plot : मिटमिट्यात ८५० प्लॉटिंगवर मनपाचा बुलडोझर

जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी, गॅसवाहिनी यासह विविध शासकीय आणि खासगी कामांसाठी शहरातील रस्ते खोदले जातात. वारंवार होणारी खोदाई ही रस्त्यांच्या दुरवस्थेच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रस्ता खोदण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे संबंधित यंत्रणेला बंधनकारक आहे.

मात्र, अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची नियमानुसार पुनर्बाधणी होत नाही. वरवरची ठिगळपट्टी करून काम आटोपले जात असल्याने काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात. तसेच रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेकडून प्रत्येक प्रभागाला वर्षाला ५० लाख रुपयांचे बजेट उपलब्ध आहे. त्याशिवाय खड्डे बुजविण्यासाठी एक कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे.

तसेच दरवर्षी सणासुदीच्या काळात महापालिकेकडून विशेष खड्डे बुजविण्याची मोहीमही राबविली जाते. मात्र, या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सींवर प्रभावी नियंत्रण नसल्याने दुरुस्तीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, डांबरी रस्त्यावर डांबराचा पॅच आणि काँक्रिटच्या रस्त्यावर त्याच पद्धतीने काँक्रिटीकरण करणे अपेक्षित आहे.

रस्त्याच्या मूळ प्रकारानुसार दुरुस्ती केल्यास नवीन काम जुन्या रस्त्याला टिकाऊपणे जोडले जाते. मात्र, अनेक ठिकाणी केवळ वरवरची ठिगळपट्टी केली जात असल्याने रस्ते पुन्हा उखडण्याचे प्रकार सुरूच आहेत. तसेच शहरात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नसल्याने खड्यांमुळे मोठ्या अपघातांची संख्या वाढलेली नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास खड्यांत पाणी साचून अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Sambhajinagar News
Ajanta-Ellora Festival : अजिंठा-वेरूळ महोत्सव यंदा वेरूळला होणार

गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सण सलग येणार आहेत. या काळात शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होणार असल्याने त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन खड्डे कधी आणि कितपत प्रभावीपणे बुजवते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

विसर्जन मार्गासाठी पॅचवर्कची निविदा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. इतर रस्त्यांवरील खड्डे महापालिकेच्या यंत्रणेकडील मशीनच्या मदतीने बुजविण्याचे काम सुरू आहे.
- संजय कोंबडे, शहर अभियंता,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news