Sambhajinagar News : अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध : अधिष्ठाता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागात रविवारी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित एकदिवसीय हस्तप्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध : अधिष्ठाताfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Committed to providing state-of-the-art facilities: Dean

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रुग्णसेवेसाठी घाटीतील विभाग अधिक सक्षम करणे आणि अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे, यासाठी संस्थाप्रमुख म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रविवारी (दि. १५) हस्तप्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे कौशल्य व आत्मविश्वास वाढून रुग्णसे-वेचा दर्जा अधिक उंचावतो, असेही त्यांनी नमूद केले.

Sambhajinagar News
आता सर्व नगरसेवकांचे लेटरहेड असणार एकसमान !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागात रविवारी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित एकदिवसीय हस्तप्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे तसेच नेत्र विभागात नव्याने स्थापित अत्याधुनिक डिजिटल टीचिंग बोर्डचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रभा खैरे, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुरेश हरबडे, डॉ. ऋषिकेश नायगावकर, नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय सांबरे, सचिव डॉ. अजय लोहिया व खजिनदार डॉ हेमंत अनासपुरे यांची उपस्थिती होती.

Sambhajinagar News
Railways housefull : लग्नसराईमुळे विविध मार्गावरील रेल्वे फुल्ल ; अनेक प्रवासी वेटिंगवर

प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे यांनी केले. कार्यशाळेचे संयोजक डॉ. संगीता पाटील व डॉ. महेश सोनपेठकर आणि सूत्रसंचालन डॉ. सनिरा वाघमारे यांनी केले. शेवटी डॉ. अनुपमा कोकाटे यांनी आभार व्यक्त केले. घाटीच नव्हे तर लातूर, जळगाव व सोलापूर, जालना, अहमदनगर आणि प्रवरानगर मेडिकल कॉलेज, लोणी येथील सुमारे ६५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या हस्तप्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

कार्यशाळेत स्लिट लॅम्प तपासणी, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन तसेच प्रगत फेकोइमल्सिफिकेशन तंत्रांसह विविध कौशल्य केंद्रांवर तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news