Railways housefull : लग्नसराईमुळे विविध मार्गावरील रेल्वे फुल्ल ; अनेक प्रवासी वेटिंगवर

विविध मार्गावरील रेल्वेंना गदी वाढल्याने अनेक गाड्या फेब्रुवारी शेवटपर्यंत तसेच काही गाड्या मार्चपर्यंत हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागले ओह.
Railways housefull
Railways housefull : लग्नसराईमुळे विविध मार्गावरील रेल्वे फुल्ल ; अनेक प्रवासी वेटिंगवरPudhari
Published on
Updated on

Trains on various routes are full due to wedding season; many passengers are waiting

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शुक्राचा अस्त संपताच ब्रेक लागलेल्या लग्नसराईला ३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. याबरोबरच इतर समारंभांची वर्दळ वाढल्याने विविध मार्गावरील रेल्वेंना गदी वाढल्याने अनेक गाड्या फेब्रुवारी शेवटपर्यंत तसेच काही गाड्या मार्चपर्यंत हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागले ओह.

Railways housefull
जि.प च्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा

लग्नासह इतर कार्यक्रमांना जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वच मागांवरील रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत. काही ठिकाणी आरक्षित डब्यांमध्येही अनधिकृत प्रवासी शिरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

विशेषतः दिल्ली, मुंबई, जयपूर, हैदराबाद याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे रेल्वेमध्ये प्रचंड गदी पाहायला मिळत आहे. दिल्ली-मुंबई मागीवरील, संपर्क क्रांती, एक्सप्रेसला ५० ते ८० पर्यंत वेटिंग असल्याने पुढील १० ते १५ दिवसांसाठी कन्फर्म तिकीट मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.

Railways housefull
आता सर्व नगरसेवकांचे लेटरहेड असणार एकसमान !

प्रवाशांचा ओघ वाढला

प्रवाशांचा ओघ वाढल्याने तात्काळ तिकीट बुकिंगही अवघ्या काही मिनिटांत संपत आहे. सकाळी तिकीट आरक्षण सुरू होताच काही सेकंदांतच सर्व सीट्स बुक होत आहेत. यामुळे नियमित प्रवासी, नोकरदारवर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना अडव्हान्समध्ये बुकिंग करूनही वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. प्रवाशांकडून आणि संघटनांकडून अतिरिक्त विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

या रेल्वेला वेटिंग

विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंना वेटिंग आहे. त्यात दिल्ली संपर्क क्रांती एक-सप्रेसला १७ मार्चपर्यंत वेटिंग आहे, तर सचखंड एक्सप्रेस, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्सप्रेसला फेब्रुवारी अखेरपर्यंत वेटिंग असल्याची माहिती रेल्-वेच्या सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news