Fire waste project : हर्सुलच्या कचरा प्रकल्पाला आग

१२ तासांहून अधिक काळ धुमसत राहिला कचरा : अग्निसुरक्षेतील त्रुटींकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय
Fire waste project
Fire waste project : हर्सुलच्या कचरा प्रकल्पाला आगfile photo
Published on: 
Updated on: 

Fire at Harsul's waste project

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव येथील आगीची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. १८) पहाटे हर्मूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील सुक्या कचऱ्याला आग लागली. प्लास्टिक, कागद, पुढे आणि रॅपर्समुळे आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले. ती विझविण्यासाठी १२५ ते १५० टैंकर पाणी लागल्याचा अंदाज असून, दुपारी साडेतीनपर्यंत आग धुमसत होती. शेड आणि यंत्रसामग्रीचे सुमारे एक कोटींचे नुकसान झाले. पडेगावप्रमाणे हसूलमध्येही कचरा जाळला जातोय का, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Fire waste project
Water supply notification : आता पाणीपुरवठ्याची सूचना मिळणार १२ तास आधी

हसूल प्रकल्पातील तीन शेडपैकी दोनमध्ये ओल्या, तर एकामध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होते. दिवाळीत आठ ते दहा दिवस सुका कचरा पुढील प्रक्रियेसाठी नेणारी वाहने आली नाहीत. त्यामुळे साठा वाढला. बुधवारी पहाटे साडेतीन ते चारदरम्यान धूर दिसताच सुरक्षारक्षकाने कंत्राटदार किशन भाटी यांना कळविले.

त्यांनी पहाटे ४.३५ वाजता अग्रिशमन विभागाला माहिती दिली. पदमपुरा, एन-९ आणि सिडको येथील पथके दाखल झाली. कचऱ्यातील फटाके फुटल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली. जेसीबीने कचऱ्याचे ढीग वेगळे करून आग पसरण्यापासून रोखली. वीजपुरवठा बंद केल्यानंतर पर्यायी डिझेल पंप सुरू झाला नाही. दोन हौदांची प्रत्येकी ७५ लाख लिटर क्षमता असतानाही खासगी टैंकर का मागवावे लागले, असा प्रश्न उपस्थित झाला.

Fire waste project
Sambhajinagar Crime News : निबंधक कार्यालयातील खंड बुकात परस्पर रजिस्ट्रीच्या नोंदी करून कोट्यवधींची जमीन लाटण्याचा डाव

उपायुक्त नंदकिशोर भोंबे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी पाहणी केली. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर आणि नगरसेवक ओसामा अब्दुल कदीर यांनीही भेट दिली. प्रकल्पाचा विमा, स्वतंत्र कंत्राट असताना होणारे विलगीकरण आणि पुनर्बाधणीचा खर्च याबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. हा खर्च नागरिकांच्या पैशांचा अपव्यय टाळण्याची मागणी करातून होणार असल्याने सार्वजनिक केली.

विरोधकांचे प्रशासनाला सवाल

विरोधी पक्षनेते समीर साजिद, ओसामा कदीर मौलाना यांच्यासह एमआयएम नगरसेवकांनी अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप केला. कंत्राटदाराने १५ दिवस कचऱ्याची निर्यात बंद ठेवल्याने साठा वाढला. धुरातील जीवघातक वायूंमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. विमा उतरविला होता का, स्वतंत्र वर्गीकरणाचे कंत्राट असताना पुन्हा विलगीकरण का, तसेच पुनर्बाधणीचा खर्च करदात्यांवर का पडावा, याची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

अग्निसुरक्षेचा अहवाल धूळखात ? गेल्या वर्षी अग्निशमन विभागाने पाहणीत त्रुटी दाखवून अहवाल दिला होता. त्यांची पूर्तता केल्याचे कळविण्यात आले नाही. २०२२-२३ मध्ये घेतलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरणही झालेले नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली. सीसीटीव्ही चित्रण तपासून आग कधी, कुठे आणि कशी लागली, हे शोधले जाणार आहे. आग लागली की लावली, याबाबत अद्याप निष्कर्ष नाही.

चारही प्रकल्पांचे फायर ऑडिट

नारेगाव, पडेगाव, चिकलठाणा आणि हसूल या चारही कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पाहणीवेळी उपायुक्त अंकुश पांढरे आणि नंदकिशोर भोंबे

पडेगाव आणि हर्मूलच्या घटना वेगळ्याः आयुक्त

गेल्या दिवाळीत पडेगावमध्ये साचलेल्या कचऱ्याला आग लागून महिनाभर धुराचा त्रास झाला होता. हर्मूलमध्ये मात्र दररोज प्रक्रिया होते. ओल्या कचऱ्यापासून खत, तर सुक्या कचऱ्याचे गड्ढे पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जातात. दिवाळीत वाहने न आल्याने साठा वाढल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. सीसीटीव्ही तपासून कारण शोधले जाईल. आग लक्षात येताच वीजपुरवठा बंद केला. जीवितहानी झाली नाही. चौकशीनंतर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.