

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेसह (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी उमेदवार दिला, आघाडीतील या बिघाडीचा लाभ महायुतीला होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, प्रत्यक्षात सेनेचा हा अट्टाहास त्यांच्याच पथ्थ्यावर पडला. एका अपक्ष उमेदवारापेक्षाही सेनेचे दिलीप घुगे यांना कमी मते मिळाल्याने डिपॉझिट जप्तीची नाचक्की सेनेला सहन करावी लागली आहे.
मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु, पदवीधर मतदार संघात शिवसेना ठाकरे मटाने उमेदवार उमा करून पूर्ण नावक्कीच केली आहे. ठाकरे सेनेने दुसऱ्यांदा या मतदार संघात उमेदवार उभा केला होता. दिलीप घुगे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेोग्या शरद पवार यांच्या राष्ट्रवातीकडूनही प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना अकरे गटाकडून उमेदवारी मागे घेण्यात येईल, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली होती.
परंतु, सेनेने उमेदवार कायम ठेवला.दरम्यान, हा सेनेचा पारंपरिक मतदार संघ नाही. परंतु, राज्यात आणि देशातील आंदोलनांमुळे तरुण पदधिर दुसऱ्या पसंतीचे एकगठ्ठा मते घुगे यांना देतील, असे तर्क लावला जात होता. प्रत्यक्षात निवडणुकीत सेनेला चांगलीच धोबीपछाड मिळाली आहे. यात घुगे यांना दुसराच काय तर तिसरा क्रमांकही मिळविला आला नाही. एका अपक्ष उमेदवारामुळे सेनेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना केवळ ८४३९ मतेच मिळविता आल्याने डिपॉझिट जप्तीची नाचक्की ओढावली आहे.
३९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
था निवडणुकीत तब्बल 41 उमेतवार निवडणूक रिंगणात होते. निश्चित कोट्याव्या 1/6 (एकशष्टांश) पेक्षा कमी मते घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. त्यानुसार म्हागजे 14169 पेक्षा कमी मते घेणान्यांचे डिपॉझिट झाले आहे. 3 उमेदवारांना 1/6 (एकशष्टांश) टक्केपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाते दिलीप घुर्गेसह 39 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील, सतीश चव्हाण आणि अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांचेच डिपॉझिट वाचले आहे.
अन् निकालापूर्वीच चव्हाण समर्थक मतमोजणी केंद्रा बाहेर
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासून आघाडीवर असलेले प्रतापसिंह पाटील यांची आघाडी तुटेल अन् सतीश चव्हाण पुढे येतील, या आशेत शेवटपर्यंत मतमोजणी केंद्रात उमेदवार चव्हाण यांचे बंधू दिलीप चव्हाण हे समर्थकांसह तळ ठोकून होते. परंतु, बाद फेरीत २४ उमेदवारांची मतमोजणी होऊनही चव्हाण यांना आघाडी मिळत नसल्याचे पाहून शेवटी दिलीप चव्हाण यांच्यासह समर्थकांनी बुधवारी रात्री १०. ३० वाजता मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
उबाठा रिंगणात उतरलीच का?
मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा आतापर्यंत युतीत भाजपकडे होता. यापूर्वी एक वेळा सेनेने अधिकृतरीत्या या मतदार संघात निवडणूक लढली होती. त्यानंतर बंदा दुसऱ्यांना ठाकरे सेनेने पदवीधरच्या रिंगणात उडी घेतली होती. परंतु, यंदा काहीच तयारी नसताना, उमेदवार दिला. अन् त्यानंतर या उमेदवाराच्या प्रचारासाठी सेनेकडून कोणीच मराठवाडतात फिरकाने नाही. जर प्रचारच करायचा नव्हता तर उमेदवार दिला तरी कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सतीश चव्हाण नॉट रिचेबल
मराठवाडा पदवीधर मतदार संघात हट्रिक करणारे माजी आमदार सतीश वव्हाण यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर असलेले उमेद्वार चव्हाण यांचा मोबाईल तिसऱ्या फेरीपर्यंत रिघेबल होता. एवढेच नव्हे तर ते मतमोजणी केंद्रातही देऊन गेले, परंतु, दुसन्या फेरीत १५ उमेदवारांची मते मोजणी झाल्यानंतर पराभवाचे संकेत मिळताच ते नॉट रिवेबाल झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.