Sambhajinagar News : टाकाऊ वस्तूंपासून बॅटरीत डिस्टिल वॉटर भरण्याचे यंत्र

सिडको आगारातील तंत्रज्ञाचा भन्नाट जुगाड; पैसा, वेळेची बचत
Sambhajinagar News
Sambhajinagar News : टाकाऊ वस्तूंपासून बॅटरीत डिस्टिल वॉटर भरण्याचे यंत्रfile photo
Published on
Updated on

Device made from waste materials for filling batteries with distilled water

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीचे तंत्रज्ञ नेहमीच आपल्या कौशल्याने कमी खर्चात मोठे प्रयोग करत असतात. याचाच प्रत्यय सिडको आगारातील तंत्रज्ञ गणेश धनवाई यांनी टाकाऊ वस्तूंपासून बसमधील बॅटरीमध्ये डिस्टिल वॉटर भरण्यासाठी एक अभिनव उपक्रम तयार केला आहे. यामुळे बॅटरीत डिस्टील वॉटर भरण्यासाठी वेळेच्या बचतीबरोबरच या पाण्याची नासाडीही थांबणार आहे.

Sambhajinagar News
MLA Satish Chavan : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा

सहसा बॅटरीमध्ये हाताने डिस्टिल वॉटर टाकताना पाणी सांडते. यावेळी पाणीही वाया जाते आणि वेळही जास्त लागतो. यावर उपाय म्हणून गणेश धनवाई यांनी एक जुनी रिकामी बकेट, वायपरच्या पाण्याची मोटर व दोन क्रोकोडाईल क्लीप (बॅटरीचे चिमटे) तसेच एका सिरीजमध्ये पुश बटन स्वीच या तिनही जुन्या आणि वापरात नसलेल्या वस्तूपासून बॅटरीत डिस्टिल वॉटर तत्काळ आणि सुरक्षितरीत्या भरण्याचा देशी जुगाड केला आहे.

या जुगाडामुळे पाहिजे तेव्हा, तसेच न सांडता आवश्यक तेवढेच डिस्टिल वॉटर बॅटरीत सहज भरता येते. या छोट्याशा जुगाडामुळे महामंडळाचा वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. एसटीच्या या तंत्रज्ञाच्या कल्पकतेमुळे कमी खर्चात मोठे काम झाले आहे.

Sambhajinagar News
उद्योगांना भेडसावतेय वीजेची समस्या

कसे काम करते यंत्र

रिकाम्या बकेटमध्ये डिस्टिल वॉटर घेऊन वायपरची पाण्याची मोटर बकेटमध्ये फिट करण्यात येते. मोटारीला बॅटरीच्या पॉझिटिव्ह-निगेटिव्हला चिमटे ( क्रोकोडाइल क्लिप) जोडल्यानंतर पुश बटण दाबताच पाईपद्वारे पाणी थेट बॅटरीच्या कप्प्यात टाकता येते. या सहज सरळ जुगाडामुळे कमी वेळात अनेक बॅटरीमध्ये आवश्यकतेनुसार डिस्टील वॉटर भरता येत आहे. हा प्रयोग वरिष्ठांच्या व सहकाऱ्यांच्या प्रोत्साहानांमुळे शक्य झाल्याची भावना धनवाई यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news