

MLA Satish Chavan: Waive fees for students from drought-affected areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोमवारी (दि.२१) आ. सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आ. चव्हाण यांनी म्हटले आहे की, दुष्काळामुळे शेतीवर णे अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे दैनंदिन व खर्च भागवतानाही पालकांची दमछाक होत असून, विद्यार्थ्यांच्या त शिक्षणाचा खर्च करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे.
त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची ाष शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी महाविद्यालये, विद्यापीठे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, फार्मसी यांसह विविध पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. मात्र, दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शैक्षणिक खर्चाचा भार पेलणे कठीण झाले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, तसेच केवळ आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने विशेष निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे