उद्योगांना भेडसावतेय वीजेची समस्या

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना सीएमआयएच्या वतीने निवेदन
Meghna Bordikar
Meghna Bordikar : उद्योगांना भेडसावतेय वीजेची समस्याfile photo
Published on
Updated on

Industries are facing a power crisis

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील उद्योगांसमोरील ऊर्जा व वीज पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न भेडसावत आहेत. याबाबत शासनस्तरावरून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. अशा मागण्यांचे निवेदन राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) कडून देण्यात आले.

Meghna Bordikar
New Water Supply Scheme : पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेचा दंडाचा बडगा

यावेळी सीएमआयएचे मानद सचिव अजिंक्य सावे, सहसचिव सौरभ छल्लानी आणि कार्यकारिणी सदस्य अनुज बन्सल उपस्थित होते. ऑरिक, बिडकीन आणि चितेगाव परिसरात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. या भागातील उद्योगांना विश्वासार्ह व अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी समर्पित १३२ केव्ही वीज उपकेंद्रे उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर तातडीने = उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शहराची आगामी २-३ वर्षांत होणारी लोकसंख्या व विजेची वाढती मागणी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

यासह ग्रीन एनर्जी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम मधील भांडवली गुंतवणुकीला अनुदान देण्यासाठी योग्य उपाययोजना आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित मागण्यांवरही सकारात्मक विचार करावा, असे नमूद करण्यात आले. यावर ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना संबंधित कामे निश्चित कालमर्यादित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत नियमितपणे संवाद व बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

Meghna Bordikar
Groundwater Levels : गंगापूर तालुक्यात पाणीबाणी; भूजलपातळी तळाला

एनर्जी कॉनक्लेव्हसाठी निमंत्रण

नोव्हेंबर २०२६मध्ये होणाऱ्या सीएमआयएच्या प्रमुख "एनर्जी कॉनक्लेव्ह" साठी राज्यमंत्री बोर्डीकर यांना निमंत्रणही देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news