Gas Agency : पैठण येथील गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी

येथील संत एकनाथ गॅस एजन्सीची चौकशीची करून परवाना रद्द करण्याचे निवेदन तहसीलदार ज्योती पवार यांना छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने देण्यात आले.
Gas Agency
Gas Agency : पैठण येथील गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणीfile photo
Published on
Updated on

Demand to Cancel Gas Agency License in Paithan

पैठण, पुढारी वृत्तसेवा: येथील संत एकनाथ गॅस एजन्सीची चौकशीची करून परवाना रद्द करण्याचे निवेदन तहसीलदार ज्योती पवार यांना छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने देण्यात आले. प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.२९) निवेदन दिले. एजन्सी चालकाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार यात करण्यात आली आहे.

Gas Agency
Sambhajinagar Accident : मनपाच्या बेफाम टोइंग व्हॅनने आंबे विक्रेत्यासह चार वाहनांना उडवले

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ग्राहकांची फसवणूक, नियमांचे उल्लंघन, तसेच शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे दुर्लक्ष या गॅस एजन्सीकडून होते. या गॅस एजन्सीकडून आवश्यक सेवा वेळेत पुरवण्यात येत नाहीत, तसेच वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा पूर्णतः अभाव असल्याचे यात म्हटले आहे. एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दादासाहेब पठाडे, अनिल राऊत, किशोर सदावर्ते, साईनाथ कर्डिले, गणेश पवार, रामेश्वर बावणे, विशाल काळे, सुधाकर सुलताने, राजेश शेजवानी, प्रीतम आडसूळ, लक्ष्मण धरम, अंबादास कानडे आदी उपस्थित होते.

Gas Agency
चुलीवर भाकरी थापून गॅस टंचाईचा वंचितकडून निषेध

दरम्यान, या संदर्भात दखल घेऊन तहसीलदार यांनी पुरवठा विभागाच्या पेशकर राजेश शिंदे, विनोद शिरसाट यांच्या पथकाकडून गॅस एजन् सीच्या कामकाजा संदर्भात पंचनामा करण्याचा आदेश दिल्यानंतर या एजन्सीचा पंचनामा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news