चुलीवर भाकरी थापून गॅस टंचाईचा वंचितकडून निषेध

गॅस टंचाईमुळे सर्वसामांन्य नागरिक जेरीस आला आहे. प्रशासन याबाबत गंभीर नाही. याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले आहे.
sambhajinagar Vanchit Bahujan Aghadi Protest
चुलीवर भाकरी थापून गॅस टंचाईचा वंचितकडून निषेधfile photo
Published on
Updated on

Protest against gas shortage by the Vanchit Bahujan Aghadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गॅस टंचाईमुळे सर्वसामांन्य नागरिक जेरीस आला आहे. प्रशासन याबाबत गंभीर नाही. याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी थापून तयार जेवणासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनला देऊन आंदोलन केले.

sambhajinagar Vanchit Bahujan Aghadi Protest
Sambhajinagar News : दालन नूतनीकरण; नव्या सभापतींचे बसण्याचे वांदे !

देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित करावा यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर, संभाजीनगर पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, सतीश गायकवाड, नगर-सेवक करुणा जाधव, पंकज बनसोडे, प्रज्ञा साळवे, संदीप जाधव, वंदना जाधव, कोमल हिवाळेसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news